पुणे येथील मॉड्युलर इन्फोटेक या आस्थापनाचे संस्थापक
श्री. रघुनंदन जोशी यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

रामनाथी (गोवा) – संगणकीय प्रणाली बनवणार्‍या मॉड्युलर इन्फोटेक या आस्थापनाचे संस्थापक आणि संचालक श्री. रघुनंदन जोशी यांनी सोमवार, १७ मार्च या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे श्री. नागेश गाडे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य, तसेच आश्रमातील व्यवस्थापन आणि आध्यात्मिक संशोधन याविषयी माहिती दिली. या वेळी त्यांच्या समवेत पत्नी सौ. मीना रघुनंदन जोशी याही उपस्थित होत्या.

अभिप्राय

१. श्री. रघुनंदन रा. जोशी : हिंदु धर्माच्या हिताकरिता अतिशय सुंदर, शिस्तबद्ध आणि आधुनिक पद्धतीने चाललेले सनातनचे कार्य पाहून पुष्कळ समाधान आणि आनंद वाटला. अशा कार्याची देशाला आणि धर्माला नितांत आवश्यकता आहे. हे कार्य प्रचंड वाढून सर्वसमावेशक होवो, ही ईश्‍वराकडे प्रार्थना !

१. सौ. मीना रघुनंदन जोशी : साधकांचे समर्पण, स्वयंशिस्तीने चालणारे सर्व व्यवहार आणि संपूर्ण जीवन आध्यात्मिक प्रगतीसाठी व्यतीत करणे, हे अतिशय सुंदर आहे, तसेच सनातनचा संशोधन विभागही खूपच वेगळा आहे.

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment