सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती

ईरोड (तमिळनाडू) – सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये आलेल्या उल्लेखानुसार ईरोडमध्ये २५ जून २०२६ या दिवशी ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला. सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ‘आयुष्य होम’ पार पडला. या होमाच्या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या होमाला सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे भक्त श्री. आणि सौ. सोमाण्णा अन् श्री. सुंदरराजनजी हेही उपस्थित होते. ‘आयुष्य होमा’चे पौरोहित्य शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती आणि त्यांचे वडील श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य यांनी केले.



या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी भगवान शिवाला ‘संपूर्ण विश्वामध्ये लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांच्या साधनेत येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केली.
वैशिष्ट्यपूर्ण क्षण
१. यागाच्या पूजेमध्ये असलेले २ कलश हे शिव-पार्वती यांचे प्रतीक होते. ज्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी होम चालू करण्यापूर्वी समई लावायला घेतली, त्या वेळी पार्वतीदेवीच्या कलशावरील कमळाचे फूल खाली पडले. ‘होम चालू होण्यापूर्वीच देवीने शुभ संकेत दिला’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या.
२. होमाची पूर्णाहुती चालू असतांना तेथे एक वानर आले. होमाच्या ठिकाणी येऊन ते पाणी प्यायले आणि त्याला दिलेली केळी त्याने खाल्ली.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन !
विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !
फलक आणि डिजिटल स्क्रीन यांद्वारे मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रभावी प्रचार !
सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते मुंबईत श्री महागणपति आणि भूमी पूजन !
इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सवात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद