
वर्धा, ३० जानेवारी (वार्ता.) – महादेवपुरा येथील शिवमंदिरामध्ये मुझफ्फरपूर (उत्तरप्रदेश) येथील भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने सनातनच्या साधकांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. शिल्पा पाध्ये यांनी श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान केला, तसेच त्यांना ‘इतिहास, संस्कृती रक्षण’ ग्रंथ, हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने भेट स्वरूपात दिली. याप्रसंगी पू. गंगोत्री तिवारी महाराज यांच्यासमवेत त्यांच्या धर्मपत्नी उपस्थित होत्या.
या वेळी पू. महाराज म्हणाले, ‘‘आपल्याला जे मिळाले, त्यात समाधान मानले पाहिजे. आपण संतुष्ट असेल, तरच आपल्याला आनंदी रहाता येते. सनातन धर्माचा प्रचार पुष्कळ झाला पाहिजे; कारण सनातन हिंदु धर्मातच परिपूर्णता आहे.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला
हिंदु म्हणून संघटित होऊनच आपण खर्या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो ! – सौ. शुभा...
जय शंकर प्रतिष्ठान’चे पप्पाजी पुराणिक यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान !
ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागतयात्रांत सनातन संस्थेच्या वतीने ‘रामराज्या’ची संकल्पना !