बेड-टी घेतल्याने अध्यात्मशास्त्रानुसार होणारी हानी

पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ‘बेड-टी’सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूंमध्ये रूढ होत आहेत. खालील लेखात ‘बेड-टी’ हे निषिद्ध का यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घेऊया. तसेच काष्ठाने दात घासल्यावर नंतर काय करावे, चूळ भरल्यानंतर आचमन का करावे यांसारख्या कृतींचे शास्त्रही पाहूया.

१. उठल्यावर मुखशुद्धी न करता चहा (बेड-टी) घेण्याने तमोगुण
वाढणे आणि मुखशुद्धी करून अन्न किंवा सात्त्विक पेय घेण्यामुळे व्यक्तीची सात्त्विकता
वाढून (वाढणे) वाईट शक्तींना व्यक्तीवर त्रासदायक शक्ती सोडणे किंवा तिच्यात प्रवेश करणे कठीण जाणे

रात्री झोपल्यामुळे रात्रीचे तमोगुणी वातावरण आणि तमप्रधान झोप यांचा परिणाम व्यक्तीच्या स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह यांच्यावर होऊन त्या देहांतील तमोगुण वाढतो. सकाळी उठल्यावर तोंड न धुता (मुखशुद्धी न करता) कोणताही पदार्थ ग्रहण केल्यास तोंडात वाढलेल्या तमोगुणाचा परिणाम अन्नपदार्थावर होऊन अन्नातील तमोगुण वाढतो आणि अशा तमोगुणी पदार्थाचे कण पोटात गेल्याने व्यक्तीचा तमोगुण आणखी वाढतो. तमोगुणी अन्नपदार्थाच्या माध्यमातून वाईट शक्ती अन्नावर त्रासदायक शक्ती सोडतात आणि काही वेळा त्या अन्नाच्या माध्यमातून पोटात प्रवेशही करू शकतात. त्यामुळे व्यक्तीला त्रास होऊ शकतो.

सकाळी उठल्यावर लगेच पाण्याने तोंड धुऊन चूळ भरल्यामुळे आणि नंतर दात घासल्याने आपतत्त्वातील चैतन्य अन् सात्त्विकतेमुळे तोंड, दात आणि हिरड्या यांतील तमोगुण अन् त्रासदायक शक्ती उणावून सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. तोंड धुऊन चूळ भरल्याने आणि नंतर दात घासल्याने मुखशुद्धीच होते. मुखशुद्धी करून अन्न ग्रहण केल्यावर अन्नकणातील सात्त्विकता वाढून सात्त्विक अन्न पोटात जाते. त्यामुळे व्यक्तीची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. वाईट शक्तींना सात्त्विक अन्नकणांवर त्रासदायक शक्ती सोडणे किंवा अशा अन्नाच्या माध्यमातून व्यक्तीत प्रवेश करणे कठीण जाते. त्यामुळे धर्मात मुखशुद्धी करूनच अन्न ग्रहण करण्यास सांगितले आहे. – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री ७.५५ )

(सकाळी उठल्यावर मुखशुद्धी न करताच बेड-टी घेण्याची अत्यंत अयोग्य पद्धत शिकवणारी निकृष्ट पाश्चात्त्य संस्कृती कुठे, तर आध्यात्मिकदृष्ट्या योग्य असलेली, मुखशुद्धी करूनच अन्न ग्रहण करण्याची पद्धत शिकवणारी महान हिंदु संस्कृती कुठे ! – संकलक)

२. काष्ठाने दात घासल्यावर नंतर ते काष्ठ नैऋत्य दिशेला फेकावे

दंतधावनानंतर रज-तमात्मक वायूने आणि लहरींनी भारित
झालेलेकाष्ठनैऋत्य दिशेला फेकल्याने काष्ठातील रज-तमात्मक धारणेचा
नैऋत्येतीललयकारक धारणेत लय होण्यास आणि वायूमंडल प्रदूषणमुक्त बनण्यास साहाय्य होणे

नैऋत्येला क्रियेच्या प्राबल्यावर लयकारक धारणा वास करत असते. या दिशेत ज्ञान आणि क्रिया या शक्तींच्या स्तरावरील लहरी घनीभूत झालेल्या असल्याने या दिशेत क्रियेच्या साहाय्याने वेगाने ज्ञानधारणेच्या स्तरावर लयकारक प्रक्रिया पार पाडली जाते. दंतधावनानंतर अशुद्ध, म्हणजेच रज-तमात्मक वायूने आणि लहरींनी भारित झालेले काष्ठ नैऋत्य दिशेला फेकल्याने काष्ठातील रजतमात्मक धारणेचा नैऋत्येतील लयकारक धारणेत लय होण्यास आणि वायूमंडल प्रदूषणमुक्त बनण्यास साहाय्य होते. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१२.२००७, दुपारी ३.२०)

३. चुळा भराव्यात आणि नंतर आचमन करावे

आचमन करण्याची कृती

आचमन करणे म्हणजे श्रीविष्णूची २४ नावे उच्चारणे. आचमनासाठी पाण्याने भरलेला कलश, पंचपात्री, पळी आणि पाणी सोडण्यासाठी ताम्हण घ्यावे. कलशातील थोडेसे पाणी पंचपात्रीत ओतावे. पंचपात्रीतील पाणी डाव्या हाताने पळीतून उजव्या तळहातावर घेऊन ‘ॐ श्री केशवाय नमः ।’ असे म्हणून प्राशन करावे. यानंतर पुन्हा तळहातावर पाणी घेऊन ‘ॐ नारायणाय नमः ।’ असे म्हणून प्राशन करावे. यानंतर पुन्हा एकदा पाणी घेऊन ‘ॐ माधवाय नमः ।’ असे म्हणून प्राशन करावे. शेवटी तळहातावर पाणी घेऊन ‘ॐ गोविन्दाय नमः ।’ असे म्हणून ते ताम्हनात सोडावे. राहिलेल्या २० नावांच्या वेळी (ॐ विष्णवे नम:। ॐ मधुसूदनाय नम:। ॐ त्रिविक्रमाय नम:। ॐ वामनाय नम:। ॐ श्रीधराय नम:। ॐ हृषीकेशाय नम:। ॐ पद्मनाभाय नम:। ॐ दामोदराय नम:। ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम:। ॐ प्रद्युम्नाय नम:। ॐ अनिरुद्धाय नम:। ॐ पुरुषोत्तमाय नम:। ॐ अधोक्षजाय नम:। ॐ नारसिंहाय नम:। ॐ अच्युताय नम:। ॐ जनार्दनाय नम:। ॐ उपेन्द्राय नम:। ॐ हरये नम:। ॐ श्रीकृष्णाय नम:। ) शरिराच्या विशिष्ट भागाला हात लावून न्यास करावा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment