
पुणे, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – शारदीय नवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील ‘चतुःशृंगी’ या स्वयंभू जागृत शक्तीस्थानाच्या ठिकाणी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याचप्रकारे चिंचवड येथे भवानीमाता मंदिरातही प्रदर्शन कक्ष लावण्यात आला होता. सहस्रो भाविकांनी याचा लाभ घेतला. अन्य ३ ठिकाणी लहान-मोठे प्रदर्शन कक्ष लावण्यात आले होते, तर ९ ठिकाणी नवरात्री विषयी मार्गदर्शन करणारी प्रवचने आयोजित केली होती. त्याचप्रमाणे ‘महिला सशक्तीकरण’ अंतर्गत स्वसंरक्षणाची जागृती करण्यात आली.

या वर्षी ‘महिला सशक्तीकरण’ या उपक्रमाच्या अंतर्गत महिलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वसंरक्षणाची आवश्यकता अन् लव्ह जिहाद सारखी संकटे यांविषयी माहिती देऊन जागृती करण्यात आली. पुणे जिल्ह्यात एकूण ३ ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. १०० हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला. शेवाळवाडी येथील भैरवनाथ मंदिर, आंबावणे (ता. वेल्हा) परिंचे गाव येथील श्री तुकाईदेवी मंदिर, हडपसर, पारगाव, दौंड येथील श्री रेणुकामाता मंदिर आदी ठिकाणी प्रवचन, सामूहिक प्रार्थना उपक्रम घेण्यात आले. शेकडो भाविकांनी याचा लाभ घेतला.

धर्मप्रेमींनी केले उपक्रमाचे आयोजन !
पारगाव येथील धर्मप्रेमींनी श्री तुकाईमाता मंदिरात सामूहिक प्रार्थना उपक्रम घेतला. या वेळी ७०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या सेवेत पारगाव शाखेतील १२ युवक सहभागी झाले होते. उपस्थित ग्रामस्थांनी उपक्रमाचे कौतुक केले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !