ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

धुळे, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील देवपूर भागातील श्री एकवीरादेवी मंदिर आणि शिंदखेड तालुक्यातील पाटण येथील श्री आशापुरी माता मंदिर येथे नवरात्री निमित्त ग्रंथ अन् सात्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन स्वामीनारायण मंदिराचे प.पू. आनंदजीवन स्वामीजी, भागवताचार्य राजीवजी झा महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन ११ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू राहील. तरी अधिकाधिक धर्मप्रेमी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी एकवीरादेवी मंदिराचे विश्वस्त श्री. सोमनाथ गुरव, हिंदुत्वनिष्ठ श्री. राजू महाराज, डॉ. संजीवजी सिंह, सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे, श्री. किशोर अग्रवाल आदी साधक उपस्थित होते.
फरीदाबाद (हरियाणा) येथे नवरात्रोत्सवात सनातन संस्था आयोजित व्याख्याने आणि ग्रंथप्रदर्शन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदूंनी नवरात्रात केवळ ९ दिवस देवीचा जागर न करता वर्षभर देवीची उपासना करावी ! –...
‘सेवाज्ञ फाऊंडेशन’च्या ‘युवा धर्म संसद’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन ठरले विशेष आकर्षण !
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्याकडून सनातन...
विविध मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या !
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !