फरिदाबाद (हरियाणा) – सनातन संस्थेच्या वतीने १० सप्टेंबर या दिवशी येथील ‘एफ् १२५ सेक्टर १०’ येथे जिज्ञासू मीनू शर्मा यांच्या घरी ‘श्री गणेशोत्सवाचे शास्त्र’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सेवेमध्ये सनातन संस्थेच्या सौ. राजबाला आणि सौ. वंदना सचदेवा सहभागी झाल्या होत्या.
क्षणचित्र
या प्रवचनाला उपस्थित असलेल्या जिज्ञासू मीनू शर्मा म्हणाल्या, ‘‘आम्हाला सत्संगामध्ये सांगितलेली महिती ही आजपर्यंत ठाऊक नव्हती. अशा प्रकारची माहिती शाळेत देणे बंधनकारक केले पाहिजे. ज्यामुळे आपल्या देवी-देवतांचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल आणि हिंदु धर्मावरील श्रद्धा वाढेल.’’ या वेळी त्यांना वाटले की, त्यांच्या घरी साक्षात् श्री गणेश उपस्थित आहेत. त्यांच्याकडे सत्संग होणे, ही श्री गणेशाचीच कृपा आहे.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !