हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि युद्धजन्य परिस्थितीत भक्तांचे रक्षण होण्यासाठी सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) येथे विविध यागांचे आयोजन

रामनाथी (फोंडा, गोवा) – सध्या सर्व जग युद्धजन्य स्थितीत आहे. भारताला कोणत्याही वेळी युद्धाला सामोरे जावे लागू शकते. युद्धकाळात, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात धनधान्यादी समृद्धता नष्ट होऊ शकते. अशा आपत्काळात भक्तांचे रक्षण व्हावे, त्यांना धनधान्याची उणीव भासू नये, तसेच रामराज्यासम हिंदु राष्ट्राची शीघ्रातिशीघ्र स्थापना व्हावी, यासाठी समृद्धता प्रदान करणार्या आदिशक्तिचा जागर विविध यागांद्वारे करण्यात येणार आहे. सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीत हे याग होतील.
🚩 Awakening of Adi Shakti during #Navratri
@SanatanSanstha to organise various Yagnas at Sanatan Ashram, Ramnathi, Goa, for the establishment of the Hindu Nation and protection of devotees during wartime.
🙏 Invoking Adi Shakti for Dharma!
#HinduRashtra #Navaratri https://t.co/IwHVutU1oN
— Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat) October 10, 2026
११ ऑक्टोबर या दिवशी असलेल्या घटस्थापनेपासून १७ ऑक्टोबरपर्यंत ‘आदिलक्ष्मी’, ‘गजलक्ष्मी’, ‘संतानलक्ष्मी’, ‘धनलक्ष्मी’, ‘धान्यलक्ष्मी’, ‘विजयलक्ष्मी’, ‘धैर्यलक्ष्मी’ आणि ‘ऐश्वर्यलक्ष्मी’ या आदिशक्तिच्या अष्ट रूपांची कृपा होण्यासाठी याग होणार आहेत. १८ आणि १९ ऑक्टोबर या दिवशी ‘नवचंडी याग’, तर २० ऑक्टोबर या दिवशी असलेल्या विजयादशमीला ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ होणार आहे.
मानवाच्या समृद्धीसाठी सनातन संस्थेच्या वतीने यागांचे आयोजन !
सनातन संस्था गेली अनेक वर्षे तिसरे महायुद्ध, तसेच नैसर्गिक आपत्ती यांविषयी समाजाला सांगत असून त्याच्या पूर्वसिद्धतेसाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर मार्गदर्शनही करत आहे. तिसरे महायुद्ध अटळ आहे आणि त्यात जगाची सर्वाधिक हानी होणार आहे. आत्पकाळाची तीव्रता आणि तिचे होणारे परिणाम सांगणारी, तसेच त्यासाठी करायच्या पूर्वसिद्धतेविषयी मार्गदर्शन करणारी ‘सनातन संस्था’ ही एकमेवाद्वितीय संस्था आहे. अलीकडेच महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळ पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून पाऊसही अनियमित होत असून त्याचेही चक्र पालटले आहे. याचा पिकांवर परिणाम होऊन महागाईही वाढली आहे. एकप्रकारे जगाच्या समृद्धीवर मोठा परिणाम होत आहे. मानवावर जेव्हा जेव्हा अशी संकटे आली, तेव्हा तेव्हा संत आणि भक्त यांनी देवाचा धावा केला आहे. हेच या यागांच्या माध्यमातून सनातन संस्था करत आहे.
साधकांनी आदिशक्तिला करावयाची प्रार्थना !
हे आदिशक्ति आदिमाते, रामराज्यासम हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रातिशीघ्र होऊ दे. त्यासाठी प्रयत्नरत असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभू दे. साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होऊ दे.
हे देवी भगवती, येणार्या आपत्काळात आम्हा भक्तांना तारणारी तूच आहेस. येणार्या आपत्काळात आम्हा भक्तांना अन्नधान्य आणि धन यांची उणीव भासू नये. तुझ्याप्रती भक्तीभाव दृढ होऊन आमचे आत्मबल टिकून राहू दे. आपत्काळात आम्हा भक्तांवर तुझी कृपा सदैव असू दे, अशी तुझ्या सुकोमलचरणी अनन्य शरणागतीने प्रार्थना आहे !
सनातन आश्रमात नवरात्रोत्सवाच्या कालावधीत विश्वकल्याणासाठी विविध होम भावपूर्ण वातावरणात संपन्न
पुण्यात ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद’ या विषयावर परिसंवाद पार पडला
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन !
विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !