छत्रपती शिवाजी महाराज !

काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. सध्याचे हिंदू मात्र त्यावर काही करतांना दिसत नाहीत आणि पुन्हा छत्रपती यावेत अन् आपले रक्षण करावे, असे त्यांना वाटते काय ?


छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती

असे विलक्षण काय होते या शिवाजी राजांमध्ये ? सर्वांत पहिली गोष्ट, म्हणजे शिवाजीराजे ज्या प्रदेशात युद्ध खेळले, त्या प्रदेशाची त्यांना पूर्ण माहिती होती. या दख्खनमधील डोंगर, नद्या, नाले कसे आहेत, दुर्ग, घाटवाटा कशा आहेत, याचा अभ्यास त्यांनी केलाच होता. एवढेच नव्हे, तर नकाशेही काढले होते.


अफझलखानवध – एक मंत्रयुद्ध

अफझलखानाचा वध ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी. ती करतांना राजांनी केलेली सिद्धता कौटिल्याने अर्थशास्त्रात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणेच आहे.


हिंदु राजे आणि त्यांचा गौरवशाली इतिहास

रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था करणारा राजा विक्रमादित्य, मूर्तीभंजक, क्रूरकर्मा महंमद घोरीने डोळे फोडल्यानंतरही खचून न जाता सेवक चंदारामच्या साहाय्याने आणि धनुर्विद्येच्या कौशल्याने घोरीचा शिरच्छेद करणारा पृथ्वीराज चौहान, शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विजनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्कराय, अकबराच्या सैन्याला जेरीस आणणारा पराक्रमी महाराणा प्रताप आणि पाच पातशाह्या मोडून काढून हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे पराक्रमी अन् धर्मवीर राजे हिंदु धर्मात होऊन गेले. या राजांच्या गौरवशाली इतिहासावर थोडक्यात टाकलेला प्रकाश….

अधिक माहिती वाचा…