श्वसनसंस्थेच्या विकारांमध्ये उपयुक्त आयुर्वेदातील काही औषधे
सितोपलादी चूर्ण : आयुर्वेदामध्ये राजयक्ष्मासारख्या गंभीर रोगांमध्ये श्वसनसंस्थेतील दूषित कफ बाहेर काढणे, शरिरातील अग्नीचे दीपन करणे (पचनशक्ती सुधारणे) आणि सर्व शरिराला बळ देणे यांसाठी हे औषध वापरले जाते.