चेन्नई येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

गुरुपौर्णिमेमध्ये मार्गदर्शन करतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

चेन्नई – चेन्नईतील अरुंबक्कम येथील डी.जी. वैष्णव महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव रविवार, १७ जुलै २०२२ या दिवशी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बालाजी कोल्ला यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे भावपूर्णरित्या वाचन केले. या वेळी चेन्नई येथील ‘वैदिक विज्ञान संशोधन केंद्र’ आणि ‘श्री टीव्ही’ यांचे संस्थापक श्री. बालगौथमन्जी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी ‘राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी काय केले पाहिजे ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

गुरुपौर्णिमेत मार्गदर्शन करतांना ‘वैदिक विज्ञान संशोधन केंद्र’ आणि ‘श्री टीव्ही’ यांचे संस्थापक श्री. बालगौथमन्जी

पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’, या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पू. पी. प्रभाकरन् यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या महोत्सवाला १०० जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार यांनी केले. या वेळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि तमिळ भाषेतील ग्रंथ यांच्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला.

सूत्रसंचालन करतांना सौ. सुगंधी जयकुमार

‘‘परकीय आक्रमणकर्त्यांनी सर्व देशांची अस्मिता, संस्कृती आणि भाषा नष्ट केली. केवळ भारतानेच आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याने स्वत:ची ओळख कायम ठेवली. सनातनच्या ग्रंथांतील मार्गदर्शन प्रत्येकाने आचरणात आणले, तरच आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हरिहरबुक्का निर्माण होऊ शकतात’’, असे मार्गदर्शन श्री. बालगौथमन्जी यांनी केले.

सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन पहातांना जिज्ञासू

 

क्षणचित्रे

१. ‘भारत हिंदु मुन्नानी’चे  (‘हिंदु आघाडीवर’चे) श्री. आर्.डी. प्रभु १० सदस्यांसह कार्यक्रमात सहभागी झाले होते.

२. सभागृहाची स्वच्छता करणार्‍या महिलेला मंदिरातच स्वच्छता करत असल्याची अनुभूती आली. तिने सत्संगािवषयी माहिती जाणून घेतली.

३. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलेल्या जिज्ञासूंनी कृतज्ञताभावाने सेवा केली आणि त्यांची भावजागृती झाली.

Leave a Comment