घराला आश्रमाप्रमाणे बनवण्याचे केलेले प्रयत्न आणि त्यामुळे जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती
मी सेवानिवृत्त झाल्यानंतर वर्ष २०१२ मध्ये आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. मुंबई (बोईसर) येथून आमचे सर्व सामान बेळगावच्या घरात आणून ठेवले. त्यातील आवश्यक तेवढे सामान काढून घेतले आणि सर्व खोके माळ्यावर तसेच ठेवले.