सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित
श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी आमच्या घरातील देवघरात श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. त्यानंतर मला श्री गणेशमूर्तीच्या समोर लावलेले निरांजन आणि समई यांच्या ज्योतींचे मूर्तीच्या डोळ्यांत प्रतिबिंब पडलेले दिसले. डाव्या डोळ्यात ते अधिक स्पष्टपणे दिसत होते.
सनातनचे दूसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या आई सौ. मानसी राजंदेकर यांना पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.
सनातन संस्थेच्या वतीने येथील जिज्ञासूंसाठी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने १० सप्टेंबर २०२१ या दिवशी श्री गणेशाच्या सामूहिक नामजपाचे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले होते. त्याला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या कु. टुपुर भट्टाचार्य यांनी श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व, श्री गणेशाचे पूजन, गणेशमूर्तीचे विसर्जन कसे करावे ? इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामूहिक नामजपाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. तेजस्वी वेंकटापूर यांनी श्रीकृष्णाविषयीची माहिती सांगितली. त्यानंतर ‘ऑनलाईन’ नामजपाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी सर्व जिज्ञासूंनी २० मिनिटे सामूहिक नामजप केला. हा कार्यक्रम जिज्ञासूंना पुष्कळ आवडला. ‘या नामजपामुळे पुष्कळ शांत वाटून आनंद जाणवला’, असे अनेकांनी कळवले.
सनातनचे काळानुरूप चालू असलेले कार्य हे देवाचे कार्य असल्यामुळे ‘देव सूक्ष्मातून स्थुलातील कार्य कसे करवून घेतो ?’, याची ही प्रचीती आहे.
कोणताही सण शास्त्र जाणून साजरा केल्यास त्याचा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक लाभ अनुभवता येतो. सनातन संस्था प्रत्येक सणाचे शास्त्र सांगून सण साजरे करायला सांगते. गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाच्या नामजपाचा लाभ घ्या, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.
सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड दिल्यास निश्चितच ती कृती आध्यात्मिक स्तरावर होते; मग ‘ती कृती संतांसाठी केलेली असो किंवा आई-वडिलांसाठी केलेली असो, तिचा आध्यात्मिक लाभ मिळतोच !