सनातन संस्थेच्या वतीने केरळ येथे ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

Article also available in :

 केरळ येथे ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या सामूहिक नामजपाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

ऑनलाईन सत्संग

कोची (केरळ) – सनातन संस्थेच्या वतीने येथील जिज्ञासूंसाठी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने १० सप्टेंबर २०२१ या दिवशी श्री गणेशाच्या सामूहिक नामजपाचे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले होते. त्याला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. स्मिता सिजू यांनी श्री गणेशाची भावार्चना सांगितली. त्यानंतर गणपतीचा नामजप ‘ऑनलाईन’ लावण्यात आला. नामजप झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी चांगले वाटल्याचे सांगितले.

गणेशभक्तांनी सांगितलेले अनुभव

१. सौ. उषा : नामजप करतांना पुष्कळ आनंद वाटला आणि प्रकाश दिसला.

२. सौ. लसिता : श्री गणेशाची मानसपूजा करतांना अंगावर शहारे आले. नामजप करतांना श्री गणेशाचे रूप डोळ्यांसमोर दिसत होते.

३. सौ. शेल्ली के.के. : पुष्कळ सकारात्मक ऊर्जा मिळाली.

४. श्रीमती राधा दिलीप : घरातील आम्ही सर्वांनी मिळून नामजप केला. माझ्या आईला जपाच्या वेळी गणपतीची सोंड तिच्याकडे वळलेली आहे, असे दिसले.

५. सौ. तंगम्मा : पुष्कळ आनंद वाटला आणि देवाचे रूप मला दिसत होते.

६. सौ. नीना उदयकुमार : आज दिवसभर नामजप करत असल्याने पुष्कळ चांगले वाटत होते आणि उत्साह वाटत होता.

७. सौ. निशा राजेश : नामजपाच्या वेळी देवाचे रूप दिसले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment