सनातन करत असलेले कार्य उत्तम ! – श्रीकृष्णनंद गुरुजी, दत्तसेवाश्रम, दावणगेरे, कर्नाटक

मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.

व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून (मृत्यूकुंडलीवरून) तिला ‘मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकणे आणि तिच्या चांगल्या-वाईट कर्मांचा बोध होणे

‘जिवाचा जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात. जन्मकुंडलीवरून जिवाला या जन्मात भोगावयाच्या प्रारब्धाची तीव्रता आणि प्रारब्धाचे स्वरूप यांचा बोध होतो. जिवाच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून ‘जिवाला मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकते. याला ‘मृत्यूकुंडली’ म्हणता येईल.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘सोनोग्राफी’ यंत्राची आवश्यकता !

‘सनातन संस्थेचा रामनाथी, गोवा येथे मुख्य आश्रम आहे. या आश्रमात राहून अनेक साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. आश्रमात या सर्वांसाठी विविध वैद्यकीय सेवा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. या अंतर्गत रुग्ण-साधकांसाठी ‘सोनोग्राफी’ ही तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे, ही आता काळाची गरज बनली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला नाथ संप्रदायाचे साहाय्य !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य जणू अवतारीच आहे. असे म्हणतात की, अवताराने कार्यासाठी जन्म घेतला की, त्याच्या त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्याचे देवतागणही जन्म घेतात. याचीच प्रचीती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या अवतारी कार्यामध्ये साधकांना येत आहे. त्यांना विविध ईश्वरी स्त्रोतांकडून या कार्यात आपणहून साहाय्य लाभत आहे.

श्राद्धामुळे पितृऋण फिटण्यास साहाय्य होते ! – सौ. सुजाता भंडारी, सनातन संस्था

श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा विधी असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. भाद्रपद पौर्णिमा ते अमावास्या या कालावधीत महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे. सर्व पितरांना सद्गती मिळण्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करणे महत्त्वाचे आहे.

‘श्री गणेशाचे अध्यात्मशास्त्र आणि सामूहिक नामजप’ या विदर्भातील ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विदर्भस्तरीय ‘श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय विविध माहिती आणि सामूहिक नामजप’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या काळात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून गणेशभक्त, जिज्ञासू आणि भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पितृपक्षाच्या काळात रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

गुरुकृपेने रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करण्याची संधी लाभली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, रामनाथी आश्रमातील चैतन्य आणि पुरोहित-साधकांचा भाव यांमुळे मला अनुभवायला आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यावरील अरिष्टे टाळण्यासाठी विविध संतांनी केलेले साहाय्य !

‘आपण चालत असू, तर वार्‍याचा विरोध होत नाही; पण धावत असू तर वार्‍याचाही आपल्याला विरोध होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कल्याणकारी कार्याच्या संदर्भातही असेच अनुभव येत आहेत. जेथे राम-कृष्णादी अवतार आणि ज्ञानेश्वर-तुकोबांसारखे संतमहात्मे यांनाही विरोध झाला, तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विरोध होणे, हे स्वाभाविक आहे.

‘पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध करणे’ आणि प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पूर्वजांना पुढील गती मिळावी आणि अतृप्त पूर्वजांचा त्रास होऊ नये, म्हणून नियमितपणे साधना करणेही आवश्यक आहे. यासाठी श्राद्ध विधीला जोडून पितृपक्षात अधिकाधिक वेळ, तसेच अन्य काळात प्रतिदिन किमान १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप सर्वांनी करायला हवा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

भाववृद्धी सत्संगात पितृपक्षानिमित्त माहिती मिळाल्याने महालय श्राद्धाच्या दिवशी आलेली अनुभूती

सकाळी देवपूजा झाल्यावर मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या प्रतिमेला मोगर्‍याचा गजरा वाहिला होता. तो गजरा रात्रीही तसाच पूर्णपणे टवटवीत होता; मात्र तेथेच बाजूला ठेवलेला गजरा पूर्ण वाळला होता.