पुणे येथील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

भाजपचे पुणे येथील आमदार श्री. सुनील कांबळे यांनी १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे आणि काही कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघमेळ्यामध्ये शास्त्र धर्म प्रचार सभेचे अनुयायी आणि सनातन संस्था यांचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची झाली भावस्पर्शी भेट !

नुकताच पार पडलेल्या माघमेळ्यात बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना शास्त्र धर्म प्रचार सभेच्या आश्रमाला सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी भेट दिली.

ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला आसाम आणि महाराष्ट्र येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अन् केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

या लेखात सनातन ग्रंथसंपदेविषयी विविध मान्यवरांनी दिलेले अभिप्राय आणि ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला प्रसिद्धी माध्यमांचा सक्रीय सहभाग आणि प्रतिसाद पाहूया. तसेच आसाम येथे मिळालेला प्रतिसादही पाहूया.

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यापेक्षा लहान वयात स्वराज्याची शपथ घेणार्‍या छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

 भारतात बहुसंख्य हिंदू आहेत; मात्र ते पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे कोट्यवधी भारतियांमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. भारतीय संस्कृतीत १ दिवसच नव्हे; तर वर्षभरातील

(म्हणे) ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या कट्टर संस्था समाजासाठी घातक !’

सनातन संस्थेवर लाखो लोकांची श्रद्धा आहे. ज्या संस्थेने समाजोपयोगी कार्य केले, अनेक लोकांना तणावमुक्त अन् व्यसनमुक्त केले, अशी संस्था समाजविघातक कशी असू शकेल ? याचा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे.

सनातनच्या साधकांकडून रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य यांची सदिच्छा भेट

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे श्री राधेश्वर महादेव मंदिराच्या ६२ व्या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य आले असता त्यांची सनातन संस्थेच्या साधकांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

सनातनचे युवासाधक कु. हेरंब उदय धुरी यांच्या हस्ते पार पडले त्यांच्या शाळेत ध्वजारोहण !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम ऑनलाईन दाखवण्यात आला.

‘सनातनचे प्रत्येक अभियान आणि उपक्रम यांना देव भरभरून प्रतिसाद देत असल्याने साधकांनी ‘प्रतिमा जपणे’ यांसह अन्य स्वभावदोषांना बळी न पडता अधिकाधिक लोकांना संपर्क करावा !’ – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

या उपक्रमांसाठी समाजातील व्यक्तींना संपर्क केल्यावर ‘ते आपली वाट पहात आहेत’, याउलट ‘साधक समाजात जाऊन अर्पण मागण्यास आणि प्रायोजक मिळवण्यास टाळाटाळ करत आहेत’. साधकांतील ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू प्रबळ असल्याने ते समाजात जाऊन अर्पण मागण्यास टाळाटाळ करत आहेत.

समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी

पंजाबमधील युवापिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे, त्यावर ‘उडता पंजाब’सारखा सिनेमाही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य ‘दारूमुक्त’, ‘व्यसनमुक्त’ होण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत.

प्रजासत्ताकदिनानिमित्त देवद (पनवेल) येथील ‘सनातन संकुल’मधील बालसाधकांनी काढली प्रबोधन फेरी

२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने देवद गावातील ‘सनातन संकुल’मधील सनातनच्या बालसाधकांनी उत्स्फूर्तपणे प्रबोधन फेरी काढली. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी या वेळी बालसाधकांनी प्रबोधन केले.