
पनवेल – २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने देवद गावातील ‘सनातन संकुल’मधील सनातनच्या बालसाधकांनी उत्स्फूर्तपणे प्रबोधन फेरी काढली. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी या वेळी बालसाधकांनी प्रबोधन केले. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा बालसाधकांनी दिल्या. तसेच ‘धर्म की जय हो । अधर्म का नाश हो । प्राणीयोमें सद्भावना हो । विश्व का कल्याण हो ।’ असा जयघोषही करण्यात येत होता. फेरीसाठी बालसाधकांनी स्वतःहून राष्ट्रध्वज, तसेच भगवे झेंडे आणले होते.मुले सामाजिक अंतर पाळून या फेरीत सहभागी झाली होती. येथील स्वयंभू शिवमंदिरापासून फेरीचा आरंभ होऊन संकुलातील परिसरात फेरी झाल्यावर सांगताही या मंदिरापाशी करण्यात आली. फेरीच्या आरंभी राष्ट्रगीत, तर अखेरीस ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !