सनातन संस्था ही ईश्‍वराची वाणी ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

सनातन संस्था ही केवळ संस्था नसून ती ईश्‍वराची वाणी आहे, असे प्रतिपादन मुत्तुरू, कर्नाटक येथील सच्चिदानंद वेद वेदांत पाठशाळेचे स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज यांनी केले. कुंभमेळ्यामध्ये ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र’ उभारण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती बोलत होते.

येत्या ४ आठवड्यांत जागतिक महायुद्धाला प्रारंभ होईल ! – रशियातील संरक्षणतज्ञाचा दावा

येत्या ४ आठवड्यांत म्हणजे मासाभरात जागतिक युद्धाला प्रारंभ होऊ शकतो, असा दावा रशियाचे संरक्षणतज्ञ पावेल फेलगेनहॉर यांनी केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आरंभलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग मालिकांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘कृतज्ञता सप्ताहा’चे आयोजन !

आपत्कालीन स्थितीला तोंड देत आनंदी कसे रहायचे, तसेच या काळात मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ सत्संग मालिका चालू करण्यात आल्या.

५.४.२०२१ या दिवशी गुरु (बृहस्पती) ग्रहाचा कुंभ राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

‘सोमवार, ५.४.२०२१ या दिवशी, म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष नवमी या तिथीला रात्री १२.२५ मिनिटांनी गुरु हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत तेरा मास रहातो. या तेरा मासांच्या मध्यावर असलेल्या दोन मासांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते.

आयकर परताव्यासाठी येणार्‍या संदेशापासून सावध रहा आणि स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी अशा संदेशाकडे दुर्लक्ष करा !

मार्चच्या अखेरपर्यंत आयकर विवरणपत्र भरण्यात येत असते आणि त्यानंतर परतावा (रिफंड) मिळवण्यात येतो. गेल्या काही काळापासून परताव्याचा हक्क सांगण्यासाठी भ्रमणभाषवर एक संदेश येत आहे. अशा संदेशापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे.

संतांचे वाङ्मय आणि चरित्र यांचा अभ्यास करण्याचे महत्त्व

संतांचे वाङ्मय आणि संतांच्या चरित्राचा ग्रंथ साधकाने जवळ ठेवला, घरी ठेवला, डोक्याखाली घेऊन झोपला किंवा त्याचा थोडासा अभ्यास करून त्यानुसार लगेच कृती केली, तर त्याच्यातील चैतन्याने साधकामध्ये आमूलाग्र पालट होऊन त्याचेही चरित्र घडते, असे मला गुरुकृपेने प्रत्यक्ष अनुभवायला आले.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘माणसाच्या देहातील आत्माराम गेला, शरिरातील पंचमहाभूते निघून गेली की, त्या शरिराला ‘मढे’ म्हणतात. माणसाच्या आत पुष्कळ घाण आहे. विटाळाचा बनलेला हा देह मेल्यावर स्मशानभूमीमध्ये न्यावाच लागतो आणि नष्ट करावाच लागतो. मग तो गोरा असो कि काळा, राजा असो कि राणी असो ! सगळे जेवढे धरतीवर जन्माला आले, त्यांचे शेवटचे ठिकाण स्मशानभूमी !’

हरिद्वार येथील सप्तसरोवर मार्गावर पेशवाईंचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागत !

सनातन संस्थेसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री आदिनाथ आखाड्याच्या पेशवाईचे (मिरवणूक) स्वागत सप्तसरोवर मार्गावर करण्यात आले. या पेशवाईमध्ये श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्वर, महंत आणि भक्तगण सहभागी होते.

गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान

येत्या ५ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. सध्या मकर राशीत असणारा हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पुढील १३ मास गुरु ग्रह या राशीत रहाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाचे राशी परिवर्तन ही महत्त्वाची घटना मानली जाते. या परिवर्तनाचा प्रभाव व्यक्ती, समाज आणि देश यांच्यावर होत असतो.

सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत असलेल्या गणेशलहरींचा सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.