बीड – जिल्ह्याच्या काही भागांत ९ मे या दिवशी विजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता. धारूर तालुक्यातील सोनीमोहा, जहांगीर मोहा, पहाडी पारगाव, चोरंबा, अरनवाडी येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला.
पुराच्या पाण्यात एक प्रवासी वाहन अडकले, तर बैलगाडी वाहून गेल्याची घटना घडली. धारुर शहरातही जोरदार पाऊस झाल्याने सखल भागांत पाणी साचले होते. वादळामुळे कोविड केंद्राच्या रस्त्यावरील विद्युत् रोहित्र कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती, तर वीजपुरवठाही खंडित झाला होत. भर उन्हाळ्यात नदीला पूर आल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !