सनातन संस्थेच्या वतीने आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाच्या सामूहिक नामजपाचे ‘ऑनलाईन’ आयोजन
या कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामूहिक नामजपाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. तेजस्वी वेंकटापूर यांनी श्रीकृष्णाविषयीची माहिती सांगितली. त्यानंतर ‘ऑनलाईन’ नामजपाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी सर्व जिज्ञासूंनी २० मिनिटे सामूहिक नामजप केला. हा कार्यक्रम जिज्ञासूंना पुष्कळ आवडला. ‘या नामजपामुळे पुष्कळ शांत वाटून आनंद जाणवला’, असे अनेकांनी कळवले.
