औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करा !

औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण जास्त, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. औषधी वनस्पतींची लागवड निवळ अर्थाजनाचे साधन म्हणून नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास वनौषधी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या तसेच पडीक भूमीमध्ये, केवळ पावसाच्या पाण्यावर लागवड करता येण्याजोग्या औषधी वनस्पती

औषधी वनस्पतींची चालू शेतीतही आंतरपीक म्हणून लागवड करता येते. कोणत्या पिकामध्ये कोणत्या वनस्पती लावता येतात याची सूची पुढे दिली आहे.

परसात किंवा बागायतीमध्ये लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती

औषधी वनस्पतींमधील अनेक वनस्पतींचा वापर औषधांबरोबरच अन्य कारणांसाठीही होतो. काही औषधी झाडांना सुंदर फुले येतात, तर काही औषधी झाडांपासून फळेही मिळतात.एकूणच औषधी वनस्पती या बहूपयोगी सिद्ध होतात.

घराच्या सज्जात लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग

शहरातील सदनिकांमध्ये पुढील १० वनस्पतींची कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लागवड करून त्या वनस्पती घराच्या सज्जामध्ये (बाल्कनीत) ठेवता येतील.

आगामी भीषण आपत्काळात आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा औषधी वनस्पतींची लागवड आतापासूनच करा !

आपत्काळात दळणवळणाची साधने, डॉक्टर, तयार औषधे इत्यादी उपलब्ध होतील, याची शाश्‍वती नसते. अशा वेळी आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा वापर करून आपल्याला आरोग्यरक्षण करावे लागेल.