१५ वर्षांपासून वैद्यकीय उपचार करूनही हातावरील चट्टे न जाणे आणि गोअर्क अन् कापूर एकत्रित करून हाताला लावल्यावर हातावरील चट्टे पूर्णपणे जाणे

मी माझ्याकडे येऊन सनातनचे सात्त्विक साहित्य घेऊन जाणार्‍यांना नमस्कार करत असे; परंतु आता सात्त्विक साहित्याची उपयुक्तता अनुभवायला आल्यामुळे येणार्‍या व्यक्तीच मला नमस्कार करतात.

श्री गणेशाच्या चित्रामुळे अभियांत्रिकी पदविकेच्या विषयाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लाभ !

बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सनातननिर्मित श्री गणेशाचे चित्र भेट देण्यात आले होते. या चित्रामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत होण्यास विशेष लाभ झाला. अनेकांनी परीक्षेस जातांना हे चित्र सोबत नेल्याचे सांगितले. १५० विद्यार्थ्यांना श्री गणेशाची चित्रे भेट दिली होती.