श्री गणेशाच्या चित्रामुळे अभियांत्रिकी पदविकेच्या विषयाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लाभ !

ganesh-murti-rangit250मिरज : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०१६ मध्ये लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक सांगली मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. सदर परीक्षेत प्रथम वर्ष (इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन) या पदविकेमधील कम्युनिकेशन स्किल्स (इंग्रजी) या विषयात कु. वृषाली धन्यकुमार आळते (रा. म्हैसाळ) हिला १०० पैकी १०० गुण मिळून राज्यात प्रथम आली, तसेच या वर्गातील १३ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले.

इंग्रजी विषयाचा इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा निकाल १०० प्रतिशत आणि मेकॅनिकल विभागाचा निकाल ९४ प्रतिशत लागला आहे. सदरच्या वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सनातननिर्मित श्री गणेशाचे चित्र भेट देण्यात आले होते. या चित्रामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत होण्यास विशेष लाभ झाला. अनेकांनी परीक्षेस जातांना हे चित्र सोबत नेल्याचे सांगितले. १५० विद्यार्थ्यांना श्री गणेशाची चित्रे भेट दिली होती, असे प्रा. काकासो घोडके (सर) यांनी सांगितले. (सदरची अनुभूती जरी अनेकांना आली, असली तरी ती वैयक्तिक स्वरूपाची आहे. ही अनुभूती इतरांना येईल असे नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात