दीर्घकाळ धान्य साठवणूक करता येईल, अशा लहान आणि मोठ्या आकाराच्या गोडाऊनचे बांधकाम अल्प खर्चात कसे करावे, याची माहिती कळवा !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

आपत्काळाच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या ठिकाणी अन्नधान्य साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान किंवा मोठी गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. आपत्काळाचा कालावधी पहाता गोडाऊनमध्ये ५-६ वर्षे धान्य टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे.

१. प्रांतानुसार हवामान वेगवेगळे असते. त्यानुसार धान्य साठवण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. त्याप्रमाणे प्रांतानुसार उपयुक्त ठरणार्‍या धान्य साठवण्याच्या पद्धतींची माहिती

२. पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने धान्य साठवले जाते. धान्य टिकवण्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये औषधी वनस्पदी आणि आधुनिक पद्धतीमध्ये विविध औषधांचा उपयोग केला जातो. या विविध पद्धतींची माहिती

३. दीर्घकाळ धान्य साठवण्यासाठी गोडाऊनच्या विविध पद्धती विकसित झाल्या आहेत. या पद्धतींची माहिती

४. ५-६ जणांचे कुटुंब, ५०-६० व्यक्तींचा समूह, ५००-६०० व्यक्ती अशा विविध गटांसाठी धान्य साठवण्याची पद्धती कशी असावी, याविषयीची माहिती

या संदर्भातील माहिती उपलब्ध असल्यास किंवा अशी माहिती कुठे उपलब्ध होऊ शकते, हे माहीत असल्यास ते खालील पत्त्यावर कळवावे.

सौ. भाग्यश्री सावंत : भ्रमणभाष क्र. ७०५८८८५६१०,

संगणकीय पत्ता : [email protected]

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ’सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा पिन – ४०३४०१

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment