संगणक दुरुस्तीच्या अंतर्गत पुढील सेवांमध्ये सहभागी व्हा !

संगणक क्षेत्रातील जाणकारांना सेवेची अमूल्य संधी !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हे ध्येय शीघ्रतेने साकार होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि सनातन प्रभात नियतकालिके या माध्यमांतून जनसामान्यांमध्ये राष्ट्र अन् धर्म या संदर्भात जागृती केली जाते. राष्ट्र आणि धर्म कार्याच्या अंतर्गत विविध सेवांसाठी संगणकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सध्या संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती यांसाठी उपलब्ध साधकसंख्या अपुरी पडत आहे. पुढील सेवांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात साधकांची आवश्यकता आहे.

 

१. सेवेचे स्वरूप

संगणक दुरुस्ती सेवेमध्ये टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अशा दोन्ही स्वरूपाच्या सेवा आहेत.

१ अ. तांत्रिक (टेक्निकल) सेवा

१ अ.१. संगणकांमध्ये Windows, MAC OS, तसेच अन्य Software इन्स्टॉल करणे

१ अ.२. नादुरुस्त संगणक (Desktop), भ्रमणसंगणक आणि भ्रमणभाष यांची दुरुस्ती करणे

१ अ.३. A4 प्रिंटर, फोटोकॉपी (झेरॉक्स) मशिन, टेलीफोन, माऊस, स्पीकर, ‘स्पाईक गार्ड’, ‘मोडेम’, ‘वाय-फाय राऊटर’, ‘पॉवर ॲडॅप्टर’, युपीएस् (600VA/1KVA) आदीं इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुरुस्ती करणे

१ अ.४. नेटवर्क केबलिंग करणे (या अंतर्गत Cable pulling, Punching, Crimping करणे आदी सेवा असतात. (यासाठी ‘नेटवर्किंग’ आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या संदर्भातील ज्ञान असावे.)

१ आ. तांत्रिक भाग नसलेली (नॉन-टेक्निकल) सेवा

संगणक, तसेच अन्य वस्तू यांची आवक-जावक पहाणे, तसेच त्यांच्या नोंदी करून पडताळणी करणे. या सेवेसाठी केवळ संगणक हाताळण्याचे ज्ञान आवश्यक आहे.

वरील सर्वच सेवांसाठी संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणकांच्या दुरुस्तीच्या संदर्भात ज्ञान अथवा अनुभव असणारे साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ आश्रमात राहून ही सेवा करू शकतात. इच्छुकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी. ही सेवा शिकून घेऊन करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा, पिन – ४०३४०१.

२. सनातनच्या आश्रमांतील पुढील सेवांतही सहभागी होऊ शकता !

‘सनातनच्या आश्रमांत पुढील सेवांसाठीही साधकांची आवश्यकता आहे – ग्रंथ, कला, दैनिक, संकेतस्थळ, ध्वनी-चित्रीकरण, वैद्यकीय, बांधकाम, धान्य, स्वयंपाकघर आणि बेकरी

या सेवांविषयीची सविस्‍तर माहिती वेळोवेळी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध केली जात आहे. वरील सेवांमध्‍ये सहभागी होण्‍यास इच्‍छुक असलेल्‍यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर आपली माहिती कळवावी. यात काही शंका असल्‍यास सौ. भाग्‍यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर विचाराव्‍यात.

Leave a Comment