घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संकलित अनुमाने दोन सहस्रांहून अधिक ग्रंथ लवकर प्रकाशित होण्यासाठी साधकांची आवश्यकता !

सनातन-निर्मित ग्रंथ

१. आपत्काळापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित ग्रंथांचे समाजाच्या दृष्टीने योगदान !

अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांतील ज्ञानाने समाज सात्त्विक (साधक) होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी पोषक होणार आहे. यातूनच हिंदु राष्ट्राची जडणघडण होणार आहे.

आ. आपण साधना केली, तरच भीषण आपत्काळात वाचू शकतो; कारण साधकांवर देवाची कृपा असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांतून सुयोग्य, सध्याच्या वैज्ञानिक युगातील पिढीला सहज पटेल असे वैज्ञानिक परिभाषेत आणि काळानुसार आवश्यक अशा साधनेचे ज्ञान मिळते.

इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर विविधांगी विषयांवरील ग्रंथ संकलित करत असल्याने त्या माध्यमातून अनेक जण आपापली प्रकृती आणि आवड यांनुसार साधनेकडे लवकर वळू शकतात.

ई. हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी ऑक्टोबर २०२२ पर्यंत ३५९ ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली आहे. अन्य अनुमाने २ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !’

– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक

२. पुढीलपैकी कोणत्याही सेवेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा !

२ अ. ग्रंथनिमिर्तीशी संबंधित सेवा

१. लिखाणाचे संगणकीय टंकलेखन, संकलन; संस्कृत श्लोक आदी पडताळणे; तसेच ग्रंथांचे अंतिम संकलन करणे

२. ग्रंथांची संरचना करणे आणि सारण्या (टेबल) बनवणे

३. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी ग्रंथ देशी-विदेशी भाषांत अनुवादित करणे

वरील सेवांसाठी संगणकाचे जुजबी ज्ञान असणे, तसेच संगणकीय टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. ग्रंथनिर्मितीशी संबंधित सेवा शिकण्यासाठी इच्छुकांना सनातनच्या आश्रमात २ – ३ आठवडे रहाता येईल. पुढे त्यांना सनातनच्या आश्रमात राहून किंवा घरी राहूनही सेवा करता येतील.

२ आ. मुद्रणासंबंधी सेवा

१. ऑफसेट प्रिंटींग, मल्टीकलर प्रिंटींग, सिंगल कलर प्रिंटींग इत्यादी सेवा

२. मुद्रणासंबंधी अहवाल भरणे यासारख्या संगणकीय सेवा करण्यासाठी ओपन ऑफीस, एक्सेल, कोरल ड्रॉ, इनडिझाईन, ई-मेल आदींचे जुजबी संगणकीय ज्ञान असावे.

३. ग्रंथांचे मुद्रण योग्य प्रकारे झाल्याची पडताळणी करणे यासारख्या सेवा एका ठिकाणी बसून करणे

४. ग्रंथांच्या खोक्यांची ने-आण करण्यासारख्या शारीरिक क्षमतेच्या सेवा करणे

५. दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवणे

वर दिलेल्या सेवा करण्याची क्षमता असणार्‍यांना वरीलप्रमाणे जुजबी ज्ञान नसेल; पण त्या त्या सेवा शिकण्याची आवड असेल, तर अशांनाही संबंधित सेवा शिकवता येतील.

३. सेवा करू इच्छिणार्‍यांनी कळवायची माहिती

घटक विवरण
१. पूर्ण नाव आणि जिल्हा
२. संपर्क क्रमांक
३. वय (वर्षे)
४. शिक्षण
५. कोणत्या भाषेंचे ज्ञान आहे ?
६. सूत्र क्रमांक ‘२ अ’ आणि ‘२ आ’ यांपैकी कोणत्या सेवा करू शकतात ? (एकापेक्षा अधिकही लिहू शकतो.)
७. सूत्र क्रमांक ‘२ अ’ आणि ‘२ आ’ यांमध्ये नमूद केलेल्या सेवांसंबंधी कोणत्या माध्यमांचे (उदा. कोरल, इनडिझाइन प्रणाली, ओपन ऑफिस, इ-मेल इत्यादी) ज्ञान आहे ?
८. वरील सेवांमध्ये काही अनुभव आहे का ?
९. सेवेसाठी आश्रमात पूर्णवेळ रहाणार कि काही कालावधीसाठी रहाणार ?
१०. काही कालावधीसाठी आश्रमात रहाणार असल्यास किती दिवस राहू शकतात ?
११. घरी संगणक आणि ‘इंटरनेट’ यांची सुविधा आहे का ?
१२. सेवेसाठी प्रतिदिन किंवा सप्ताहात किती घंटे देऊ शकतात ?

या सेवा करू इच्छिणार्‍यांनी वरील सारणीनुसार स्वत:ची माहिती सनातनच्या साधकांना संगणकीय धारिकेच्या किंवा लिखित स्वरूपात द्यावी आणि साधकांनी ती माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन ४०३ ४०१.

Leave a Comment