अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या तीव्रतेमध्ये २० ते ४० टक्क्यांनी वाढ !
उत्तर हिंदी महासागरातील प्रत्येक चौथ्या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होत आहे. जगभरातील चक्रीवादळांपैकी ६ टक्के चक्रीवादळे उत्तर हिंदी महासागरात सिद्ध होत आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळांची तीव्रता २० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे, असे हवामान शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे.
