
नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) – परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या चरित्राचा दुसरा खंड ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ (पू. आठवले यांची ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया, त्यांचे सन्मान सोहळे आणि त्यांच्या विषयीच्या अनुभूती) या ग्रंथाचे प्रकाशन सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते २६ मार्च या दिवशी करण्यात आले. हा ग्रंथ परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केला आहे. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, सनातन संस्थेच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे बांधकाम व्यावसायिक आणि सनातनचे साधक श्री. आनंद पाटील उपस्थित होते. सनातन संस्थेच्या संत पू. आधुनिक वैद्या (श्रीमती) शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती होती. येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यशाळेत कोल्हापूर, सांगली, सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले आहेत. शंखनादानंतर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यशाळेत धर्मप्रेमींना साधना, हिंदु राष्ट्र, आदर्श वक्ता कसे व्हावे ? यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन मिळेल.

पू. भाऊकाकांचे ‘गीतादर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या
विविध अंगांचा बोध’, हे तत्त्वज्ञानावरील ग्रंथ अप्रतिम ! – मनोज खाडये
पू. भाऊकाकांनी ‘गीतादर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’, हे तत्त्वज्ञानावरील अप्रतिम ग्रंथ लिहिले आहेत. ते ज्ञानयोगानुसार साधना करतांना २७ जून २०१९ या दिवशी सनातनच्या १०१ व्या संतपदी विराजमान झाले. ते वयाच्या ८६ व्या वर्षीही विविध शब्दकोश आणि संदर्भग्रंथ यांचा अभ्यास करून भाषांतर परिपूर्ण करत आहेत.
ग्रंथांच्या माध्यमातील अमूल्य ज्ञानाचा
सर्वांनी लाभ करून घ्यावा ! – आनंद पाटील, सनातन संस्था
ग्रंथांच्या माध्यमातून दिलेले ज्ञान अमूल्य आहे. त्याचा आपण सर्वांनी लाभ करून घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या अल्प कार्यकाळात इतक्या मोठ्या प्रमाणात गड-दुर्ग बांधले. हे गड-दुर्ग स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहेत. मी व्यवसाय करतांना राष्ट्र आणि धर्म हित जाणून केला.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !