रशिया-युक्रेन युद्ध अनेक वर्षे चालू राहू शकते ! – नाटो

जेन्स स्टोल्टेनबर्ग

ब्रुसेल्स (बेल्जियम) – पश्चिमी देशांना युक्रेनला दीर्घकाळ साहाय्य करत रहाण्याची सिद्धता ठेवावी लागेल. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध काही वर्षे चालू राहू शकते. हे साहाय्य करण्यात अधिक खर्च होणार आहेच, तसेच अन्नधान्य आणि ऊर्जा यांची वाढती महागाई असूनही हे आवश्यक आहे, असे वक्तव्य ‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’ संघटनेचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर केले. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी या स्वरूपाचेच वक्तव्य याआधी केले होते. दोन्ही नेत्यांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्र साहाय्य करत राहिल्यास युक्रेनचा विजय होण्याची शक्यता वाढेल, असे म्हटले आहे.

(प्रत्यक्षातही द्रष्ट्या संतांनी २०२५ पर्यंत आपत्काळ असणार. युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती येणार, अशा संकटांची पूर्वसूचना मानवाला वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शन व भाकितांमधून दिली आहे. – सनातन संस्था)

Leave a Comment