सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान
Share this on :
श्री. अभय वर्तक यांना पुरस्कार प्रदान करतांना डावीकडे ह.भ.प. शंकर महाराज बडवे आणि श्री. वर्तक यांच्या डाव्या बाजूला ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज
क्रांतीवीर वसंतदादा बडवे न्यासाचा कार्यक्रम
पंढरपूर, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील क्रांतीवीर वसंतदादा बडवे न्यासाच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना १९ ऑक्टोबर या दिवशी ह.भ.प. शंकर महाराज बडवे यांच्या हस्ते हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येथील क्रांतीवीर वसंतदादा बडवे पुतळा, रुक्मिणी पटांगणात पार पडला. या कार्यक्रमाला संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची उपस्थिती लाभली.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळेच हा गौरव शक्य ! – अभय वर्तक
पुरस्कार मिळाल्यावर मनोगत व्यक्त करतांना श्री. वर्तक म्हणाले, आज माझ्यासारख्या एका सामान्य साधकाला क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्टच्या वतीने क्रांतीवीर वसंतदादा बडवे शौर्य पुरस्कार दिला जात आहे, याविषयी मी कृतज्ञ आहे. हा पुरस्कार म्हणजे धर्मासाठी छातीचा कोट करून उभे असलेल्या शूर हिंदूंना मिळालेला पुरस्कार आहे, अशी माझी भावना आहे. मी वृत्तवाहिन्यांवर आपणांस दिसत असलो, तरी माझ्यासारखे सनातनचे सहस्रो साधक आज घराघरांत जाऊन सनातन हिंदु धर्माचा प्रसार करत आहेत. हिंदु धर्मावरील खोडसाळ टीकांचा प्रतिवाद करणे, हिंदु धर्माचे वैचारिक संरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्यच आहे. मला ही संधी सनातन संस्थेने उपलब्ध करून दिली. ज्यांच्या दिशादर्शनामुळे आम्ही धार्मिकदृष्ट्या जागृत आणि धर्माभिमानी झालो, त्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळेच माझा आज हा गौरव होत आहे, असे मला वाटते. खरे तर हा पुरस्कार घेण्याची माझी पात्रता नाही; कारण ज्या हिंदु समाजाला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांच्या शौर्याची परंपरा आहे, त्यांच्या शौर्याची योग्यता कुणीही करू शकत नाही.
श्री. अभय वर्तक यांनी शौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तर देतांना व्यक्त केलेले विचार !
हिंदु समाजामध्ये शौर्याचे जागरण व्हावे !
श्री. अभय वर्तक
१. पुरस्काराचे महत्त्व !
हिंदु धर्माचा प्रसार करतांना मला जाणवले की, भारतियांमध्ये शौर्याची न्यूनता नाही. गेल्या मासात एकीकडे भारतातील काही जण राष्ट्रपतींना याकूबला फासावर देऊ नये, असे (अमानुष) मानवतेचे गार्हाणे घालत होते, तर तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये दोन शेतकरी तरुणांनी निःशस्त्र असतांना एके ४७ हाती असलेल्या कासीम खान या कसाबसारख्या खतरनाक आतंकवाद्याला जिवंत पकडून दिले. हे खरे शौर्य ! आज गोवंशहत्या बंदी कायदा असतांनाही राज्यात गोवंशाची आणि गोमांसाची तस्करी चालू आहे. ती प्राणपणाने रोखणारे गोरक्षक शौर्यशाली आहेत. यांच्या शौर्याचा आदर्श हिंदु समाजाने घेतला पाहिजे. हिंदूंमधील शूरतेचा विकास होण्याची आज नितांत आवश्यकता आहे. आपण देत असलेला पुरस्कार खरे तर हिंदु समाजात शौर्याचे जागरण करणारा आहे. निस्तेज होत चाललेल्या हिंदु समाजाला त्याच्यातील तेजत्वाची जाणीव करून देणारा आहे. आणि म्हणून हा पुरस्कार आमच्यासाठी अनमोल आहे. हिंदु धर्म आणि समाज यांच्या जागृतीच्या कर्तव्याचे आमचे दायित्व वाढवणारा हा पुरस्कार आहे. हे उत्तरदायित्व ईश्वराने आमच्याकडून यशस्वीरित्या पार पाडून घ्यावे, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
२. नवरात्रामुळे शौर्य पुरस्काराला वेगळेच महत्त्व !
हा पुरस्कार नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दिला जाणे, हा एक शुभयोगच म्हणावा लागेल ! दुर्गादेवीने ९ दिवस शौर्यपूर्वक पराक्रम गाजवून महिषासुराचा वध केला. ५१०० वर्षांपूर्वी अज्ञातवासाच्या शेवटच्या दिवशी गांडीवधारी अर्जुनाने एकट्याने रथी-महारथी कौरवांचा पराभव केला होतो. या शूर देवता आणि महापुरुषांचे आम्ही वंशज आहोत. विजिगिषु वृत्तीचे संवर्धन करणारा विजयादशमीचा हा सण हा आमच्यातील शौर्याचे जागरण करणारा आहे. देशातील महात्म्या-पंडितांनी अहिंसेचा अतिरेकी प्रचार केल्याने हिंदु समाज शौर्य गाजवणे विसरून गेला आहे. या वीरवृत्तीचे प्रगटीकरण आता झाले पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम करणार्या क्रांतीविरांचेही हे स्वप्न होते, हे आपण विसरता कामा नये.
३. शौर्याहून श्रेष्ठ काहीही नाही !
महाभारतात म्हटले आहे, न हि शौर्यात्परं किंचित् ॥ (महाभारत १२.९९.१८) म्हणजे शौर्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. राम-कृष्ण आणि प्रत्येक अवताराने शौर्याने लढाई करून तत्कालीन रावण अन् कंस यांसारख्या समाजावरील संकटांना दूर केले. समर्थ रामदासस्वामी म्हणतात, धटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट । त्यांनी जी बलोपासना सांगितली, ती शौर्य गाजवण्यासाठी ! त्यामुळेच मावळे बलशाली झाले. हिंदवी स्वराज्यासाठी तळहाती प्राण घेऊन लढण्यास तयार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वीरवृत्तीने शौर्य गाजवले; म्हणून पाच पातशाह्या पायदळी तुडवून त्यांनी हिंदवी स्वराज्याचा भगवा डौलाने फडकवला. मराठ्यांना राजा नव्हता, तेव्हा आमच्या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या सेनानींनी औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडला ! थोरल्या बाजीराव पेशव्यांनी हिंदवी साम्राज्याचा विस्तार केला, तर राघोबादादांनी नुसता अटकेपार भगवा फडकवला नाही, तर दिल्लीचे तख्तही फोडले. अहो, देश पारतंत्र्यात असतांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी विदेशात जाऊन सैन्य उभे केले आणि म्यानमार, अंदमान पादाक्रांत केले. आझाद हिंद सेनेच्या भीतीने इंग्रजांना देश सोडावा लागला. अशा किती शौर्यकथा हिंदूंना सांगाव्यात ? पण आज ही हिंदुशौर्याची परंपरा आज लपवली जाते. ती हिंदूंना शिकवली जात नाही; कारण हिंदूंनी शूरतेने आचरण करणे, हे काही राष्ट्रद्रोही शक्तींना नको आहे.
४. भोंगळ निधर्मीवादाचा फटका !
भोंगळ निधर्मीवाद आज देशाच्या मुळावर उठला आहे. जी प्रसारमाध्यमे आता गरब्यात धर्मांधांना प्रवेश द्या, असे हिंदूंना सांगत आहेत, तीच माध्यमे जून महिन्यामध्ये धर्मांधांना योगाची सक्ती करू नका ! असे सांगत होती. आज कथित दादरी प्रकरणावरून ओरड चालू आहे; मात्र अखलाकने वासरू मारल्यानंतर त्याला खडसवायला गेलेल्या राहुल यादव या तरुणाला अखलाकच्या मुलाने बेदम मारले. राहुल यादव अजूनही दवाखान्यात आहे. तो मृत्यूशी झुंज देत आहे, हे कुठलेही प्रसारमाध्यम पुढे आणत नाही. निधर्मीपणाचा टेंभा मिरवणारे अनेक लेखक, कथित विचारवंत त्यांचे पुरस्कार परत करत आहेत. आम्हाला त्यांना विचारायचे आहे. जेव्हा काश्मीरमध्ये लाखो हिंदूंना कंठस्नान घालण्यात आले, त्यांच्याच देशात त्यांना परागंदा व्हावे लागले, तेव्हा त्यांचा मानवतावाद कुठे होता ? जेव्हा काँग्रेसींनी शिखांचे शिरकाण केले, तेव्हा कुणी एखादा पुरस्कार का परत केला नाही ? आज डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येविषयी राग व्यक्त केला जात आहे; मात्र २००८ मध्ये कंधमल (ओडिशा) येथे ८४ वर्षीय हिंदु संत स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या छातीची चाळण होईपर्यंत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तेव्हा मिशनर्यांचा निषेध करण्याऐवजी हे निधर्मी कुठल्या बिळात जाऊन बसले होते ? निधर्मीपणाच्या नावाखाली चालू असलेला हा पक्षपातच आज हिंदूंच्या सहनशक्तीचा अंत करणारा आहे; म्हणूनच शौर्यशाली हिंदू पाकप्रेमींना काळ्या शाईची अंघोळ घालतांना कुणाची पर्वा करत नाहीत. ते खरे शौर्य आहे. त्या बाहूतील बळ कसे होते, हे शोधण्याची आज आवश्यकता आहे.
५. आज भारतियांना त्यांच्यातील सिंहत्वाची जाणीव करून देणे आवश्यक !
एकदा स्वामी विवेकानंद यांच्यासमोर एका इंग्रज वक्त्याने भारतियांना हीन संबोधले. तेव्हा स्वामीजींनी रागाने सर्वांसमक्ष त्या वक्त्याच्या थोबाडीत दिली. भारतीय कुत्रे नाहीत, तर सिंह आहेत, असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले. असा भारतीयत्वाचा अभिमान आपल्यालाही स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे. खरे तर आजच्या या शूरांच्या भारतभूमीत या शौर्य पुरस्कारासाठी अनेक नावे पुढे यायला हवी होती. हा पुरस्कार कुणाला देऊ ? आणि कुणाला नको ? असे व्हायला हवे; मात्र तसे होत नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. आज हिंदूंची अवस्था शेळ्यांच्या कळपात चुकून गेलेल्या सिंहाच्या छाव्यासारखी झाली आहे. शेळ्यांच्या कळपात राहिल्याने तो छावा गवत खायला लागतो. शिकार करायचे विसरूनच जातो. एकदा एक सिंह त्याला विहिरीवर नेतो. त्याला पाण्यात प्रतिबिंब दाखवतो आणि तू सिंह आहेस. सिंहासारखा वाग. गवत खाऊ नकोस, शौर्य गाजव ! अशी जाणीव करून देतो. आज भारतीय समाजालाही तो सिंह असल्याची जाणीव आपल्याला करून द्यावी लागेल.
आम्ही शौर्य दाखवू लागलो, तर भारतात अतिरेकी पाठवणार्या आणि प्रतिदिन सीमेवर गोळीबार करणार्या पाकिस्तानकडे आम्ही शांतीची कबुतरे कधीही पाठवणार नाही, तर पाकिस्तानमधील आतंकवादी केंद्र नष्ट करू !
आम्ही शौर्य दाखवू लागलो, तर बॉम्बस्फोट झाल्यावर मेणबत्ती मोर्चे काढणार नाही, तर बॉम्बस्फोट करणार्यांचा देशच जगाच्या नकाशावरून नष्ट होईल, यासाठी प्रयत्न करू !
आम्ही शौर्य दाखवू लागलो, तर याकूब मेमन, मोहम्मद अफजल, कसाब यांच्यासारखे आतंकवादी कारागृहात २२ वर्षे पोसलेच जाणार नाहीत !
६. सनातनवरील अन्याय !
आज या निधर्मीवादाचा सर्वाधिक फटका कुणाला बसत असेल, तर तो सनातनला ! निधर्मीवादाच्या नावाखाली आम्हाला वैचारिक आतंकवादाला सामोरे जावे लागत आहे. त्याविषयी थोडक्यात सांगतो. डॉ. दाभोलकर यांच्यानंतर कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या निमित्ताने सनातनला लक्ष्य करण्यात आले.
अ.साम्यवाद्यांच्या के. मणी नावाच्या सरचिटणिसाने आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २५० कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या, असे जाहीर सभेत सांगितले. असे असतांना हे साम्यवादी सनातनवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, हे लांच्छनास्पद आहे.
आ.सनातनच्या एका कार्यकर्त्याला पकडले; म्हणून सनातनवर बंदी घालण्याचा आग्रह तथाकथित पुरोगाम्यांनी धरला. हाच नियम लावला, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर किती वेळा बंदी घालावी लागेल ?
इ.प्रत्येक वृत्तवाहिनीवर शाम मानव आरोप करत सुटले. वयाच्या ६० वर्षांनंतर केवळ सनातनद्वेषाचा कंड शमवण्यासाठी हा माणूस, क्षमा करा मानव ! प्रत्येक वाहिनीवर जाण्यासाठी धावाधाव आणि आटापिटा करत होता. काय तर म्हणे सनातनचे परात्पर गुरु डॉ. आठवले संमोहन करून आतंकवादी कृत्ये घडवतात. नंतर ती कृत्ये करणार्यालाही ते आठवत नाही. अनेक संमोहनतज्ञांनी हे शक्य नसल्याचे सांगूनही मानव ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी अंनिसच्याच नवख्या हमीद दाभोलकर यांनी त्यांना चपराक दिली आणि हे शक्य नसल्याचे सांगितले. पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी ही खेळी असल्याचे हमीद यांनी सांगितल्यावर मानव थंड झाले.
ई.सनातन संस्थेत स्वेच्छेने राष्ट्रकार्यासाठी आलेल्या महिला साधिकांविषयी २-२ घंटे कार्यक्रम करून सनातनची बदनामी करण्यात आली; मात्र जेव्हा त्या वृत्तवाहिन्यांसमोर आल्या, तेव्हा सत्य बाहेर आले. त्या साधिका सनातनच्या आश्रमात रहात नव्हत्या, तर मुंबईत स्वतःचा व्यवसाय करून नामजप, ध्यानधारणा आदी साधना करत होत्या, हे जगासमोर आले.
उ.आपल्याच सोलापूर जिल्ह्यातील कु. प्रियांका स्वामी यांनीसुद्धा धर्मकार्यासाठी स्वतः आश्रमात रहाण्याची सिद्धता दर्शवली होती. त्यांना सनातनने साहाय्याची तयारी दाखवली. वयाच्या २२ व्या वर्षापासून म्हणजे गेली ४ वर्षे कु. प्रियांका स्वामी ३ राज्यांच्या धर्मप्रसाराचे दायित्व समर्थपणे सांभाळत होत्या. त्यांनी समाजातील अनेकांना साधनेविषयी महत्त्वाचे साहाय्य केले आहे. आज त्या संपूर्ण कर्नाटक राज्याची धुरा सांभाळत आहेत. खरे तर ही त्यांच्या पालकांसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे ! मात्र वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या पालकांच्या भावनांचे भांडवल केले. स्वतःचा टीआर्पी वाढवून घेतला. तथाकथित नैतिकतेचे भोंगळ प्रदर्शन केले. जेव्हा कु. प्रियांका स्वामी वृत्तवाहिन्यांशी बोलल्या, तेव्हा त्यांच्या पालकांनीही धर्मकार्याला मान्यता दिली आणि सनातनची अपकीर्ती करणार्यांना चपराक बसली.
ऊ.सनातनवर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर आणि आता कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर ही सातत्याने आतंकवादी संघटना म्हणून आरोप केले जात आहेत. आम्हाला या निधर्म्यांना, सनातनवर बंदीची मागणी करणार्यांना विचारायचे आहे.
१. आम्ही शेकडो धर्मसत्संग घेतो; म्हणून आम्ही आतंकवादी आहोत का ?
२. आम्ही लोकांना धर्मशिक्षण देतो; म्हणून आम्ही आतंकवादी आहोत का ?
३. आम्ही हिंदूंना जागृत करतो. त्यांना धर्मकार्यासाठी कृतीशील करतो; म्हणून आम्ही आतंकवादी आहोत का ?
४. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारसा सांगतो, त्यांची तत्त्वे आचरणात आणतो; म्हणून आम्ही आतंकवादी आहोत का ?
५. आम्ही सरकारीकरण झालेल्या पंढरपूर, कोल्हापूर येथील देवळांचा भ्रष्टाचार बाहेर काढला; म्हणून आम्ही आतंकवादी ठरतो का ? आम्ही मंदिर सरकारीकरणासारख्या धर्मविरोधी कायद्यांना विरोध केला, हा आतंकवाद आहे का ?
६. आम्ही धर्मद्रोह्यांना पुरून उरतो. त्यांच्या अयोग्य विचारांचे सडेतोड खंडण करतो. त्यांच्याशी वैध मार्गाने वैचारिक आणि न्यायालयीन लढा देतो. धर्मद्रोही भ्रष्टाचारही करतात, हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध केलेे; म्हणून आम्ही आतंकवादी आहोत का ?
७. गोव्यात गेली ४ वर्षे आम्ही अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून देशभरातील ४० हिंदुत्ववादी संघटनांच्या २०० हून अधिक हिंदुत्ववाद्यांचे आम्ही राष्ट्रव्यापी संघटन केले आहे. त्यांना धर्मकार्यासह साधनेला लावले आहे, हा आमचा दोष आहे का ?
८. राष्ट्रीय सणांत प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांमुळे होणार्या राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या विरोधात सनातनने १३ वर्षे मोहीम राबवली. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता राज्यशासनाने त्याविषयी आदेश काढले आहेत. राष्ट्रध्वजाचा अवमान ८० टक्क्यांपर्यंत रोखला गेला आहे; म्हणून सनातन आतंकवादी आहे का ?
९. सनातन संस्थेने २७६ ग्रंथांच्या १४ भाषांत ६१ लाख ६० सहस्र प्रती वितरित करून समाजाला खरा धर्म समजावून सांगितला. अजून ३ सहस्र ३२४ ग्रंथांचे लिखाण आम्ही एकत्र करून ठेवले आहे. अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना करण्यासाठी आम्ही हिंदु धर्माचा अभ्यासक्रम बनवला आहे. ही आतंकवादाची लक्षणे आहेत का ?
१०. या पुरोगाम्यांची आणि सनातनच्या विरोधकांची आतंकवादाची नेमकी व्याख्या काय, ते तरी जगाला एकदा कळू दे !
ए.माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्याही हत्येचा छडा अजून लागला नाही, त्याविषयी कधी एखाद्या तथाकथित पुरोगाम्याने आवाज उठवला आहे का ? शेट्टी यांचा भाऊ एकटा न्यायालयीन लढाई लढत आहे. त्याने पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल केले आहेत. आपल्यापैकी कुणीही त्या ठिकाणी असते, तर हेच केले असते; मात्र दाभोलकर-पानसरे यांच्या नातेवाइकांची भूमिका संशयास्पद आहे. या दोघांच्या हत्येचा शोध लागत नाही; म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना कधीच दोष दिला नाही. त्यांनी केवळ एकच मागणी लावून धरली, सनातन संस्थेला टाळे ठोका ! सनातनला चिरडून टाका ! आश्रमांची झडती घ्या ! सनातनच्या ग्रंथांवर आणि सनातन प्रभातवर बंदी घाला !
ही मागणी केली जाते; कारण सनातन संस्थेने डॉ. दाभोलकर यांचा धर्मद्रोह उघडा पाडला. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर आम्ही काढला. सनातनच्या चौकशीची मागणी डॉ. दाभोलकरांनी केली. सनातनचा सगळा लेखा-जोखा पोलिसांनी तपासला. त्यांना एकही चूक किंवा अपप्रकार आढळला नाही. डॉ. दाभोलकरांच्या ट्रस्टची चौकशी करायला सांगितल्यावर तत्कालीन गृहमंत्री रा.रा. पाटील म्हणाले, अहो त्यांची चौकशी करता येत नाही; कारण त्यांच्याकडे हिशोबाची कागदपत्रेच नाहीत.
७. समीर गायकवाड प्रकरण म्हणजे पूर्णतः बनाव !
पानसरे हत्येच्या प्रकरणी श्री. समीर गायकवाड हे निर्दोष असून त्यांच्या विरोधात बनाव केला आहे, असे सनातनचे मत आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हांस बंधनकारक आहेच; मात्र तोपर्यंत कुणीही एका व्यक्तीच्या सिद्ध न झालेल्या चुकीसाठी सनातनचा बळी देण्याचा प्रयत्न करू नये. हे माझे एकट्याचे नाही, तर द्वारकापिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, आचार्य गोविंददेवगिरीजी, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अनेक संत-महंत, शिवसेना, गोव्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि प्रत्येक न्यायप्रिय व्यक्तीचे मत आहे.
८. सनातनची विचारसरणी चुकीची आहे का ?
नेहमी सनातन संस्थेलाच विरोध का होतो?, असे आम्हाला विचारले जाते. याचे उत्तर असे आहे. धर्म न मानणार्या पुरोगाम्यांना सनातनचा तेजस्वी धर्मप्रसार सहन होत नाही. धर्माला विरोध करणार्यांसाठी, अल्पसंख्यांकांचे राजकारण करणार्यांसाठी सनातन संस्था हे सोपे लक्ष्य (सॉफ्ट टार्गेट) आहे. जे लोक सनातनची शिकवण चुकीची असल्याचे सांगतात, त्यांना आमचा प्रश्न आहे. सनातनची शिकवण चुकीची असती, तर सहस्रो जणांनी तन, मन आणि धन यांचा त्याग करून हिंदु धर्माची सेवा केली असती का ? सनातनचे ५४ साधक संत झाले असते का ? साम्यवादी, पोलीस किंवा इतर कोणी असे संत तयार करू शकतात का ? कुत्र्याला पिसाळलेले म्हणा आणि ठार मारा, अशी इंग्रजीतील एक म्हण आहे, तसेच सध्या सनातनविषयी होत आहे. कोणत्याही निमित्ताने सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली जाते. या मंडळींना हे लक्षात येत नाही की, बंदी घातल्यामुळे सनातनचे सर्व कार्य थांबेल; पण जाज्ज्वल्य धर्माभिमान निर्माण झालेले सनातनचे साधक, त्यांनी मिळवलेले साधनेचे बळ, त्यांना आलेल्या ईश्वरी साक्षात्काराच्या अनुभूती कुणीतरी हिरावून घेऊ शकेल का? म्हणूनच बंदीसारख्या धमक्यांना सनातनचे साधक भीक घालत नाहीत. आम्ही सनातनचे साधक अध्यात्म जगणारे आहोत; मग आम्हाला मानसिक स्तरावरील धमक्या देऊन काहीही साध्य होणार नाही. सनातनचा पाया सत्य धर्म आहे. त्यामुळे सत्यमेव जयते ।, या मुंडकोपनिषदातील धर्मवचनावर आमचा दृढ विश्वास आहे.
९. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा आर्थिक आणि धार्मिक घोटाळा
अशाच प्रकारचा घोटाळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनेही केला आहे. आज पंढरपुरात असल्याने त्याचा परामर्श घेणे मला क्रमप्राप्त आहे.
अ.कोट्यवधी रुपयांचा अर्पणनिधी लाटला. त्याचा हिशोबच नाही.
आ.देवाचे लाखो रुपयांचे अलंकार गहाळ झाले आहेत.
इ.देवळात अर्पण केलेले गोधन, हे परस्पर कसायांना विकण्यात आले.
ई.देवस्थानच्या आर्थिक व्यवहारात प्रचंड अनियमितता !
उ.४८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखा परीक्षकांकडून तपासूनच घेतलेला नाही !
ऊ.भक्तनिवास इमारतीमागे वर्ष २००० ते २०१० या १० वर्षांत ४७ लाख ९७ सहस्र ७१६ रुपयांचा तोटा !
ए.२९ वर्षांत मंदिर समितीने महाराष्ट्राच्या विधीमंडळात वार्षिक लेखा परीक्षण अहवाल सादर केलेला नाही !
ऐ.मंदिर समितीकडे किती एकर जमीन आहे, याचे मोजमाप नाही. ती कुणाला कसायला दिली, का दिली, याच्या नोंदी नाहीत. हिंदु जनजागृती समितीने पाठपुरावा केल्यानंतर आता जमिनी परत घेण्याचे काम चालू झाले आहे.
ओ.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने अण्णा डांगे यांना आणले होते. त्यांनी न्यायालयाच्या निर्देशाचे कारण पुढे करत देवळातील बडवे आणि उत्पात यांना बाहेर काढले. तेथे पुजारी म्हणून महिलांचीही नेमणूक करून धर्मद्रोह केला.
औ.डॉ. पाटणकरांसारख्या विद्रोही व्यक्तीने मग विठ्ठलाच्या पूजेतील पुरुषसूक्ताला विरोध केला. जे विद्रोही देवच मानत नाहीत, त्यांचा हिंदु धर्मात ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार ! एकापेक्षा एक प्रमाद अण्णा डांगेंच्या काळात झाले.
अं.येथील जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी विठ्ठलाची नित्यपूजा ऐन वारीच्या काळात बंद पाडली. त्याला येथील वारकरी मंडळींनी विरोध केला, तेव्हा त्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सहभागी झाली. सनातन प्रभातच्या उपसंपादकांनी पालकमंत्री श्री. सुभाष देशमुख यांना वस्तूस्थिती सांगितली. त्यांना वारकर्यांच्या आंदोलनाकडे लक्ष घालण्यास सांगितल्यानंतर त्यांनी दुसर्या दिवशी पुण्यातील चर्चेत विषय मांडण्याचे मान्य केले.
क.त्यानंतर वारकर्यांनीही पालकमंत्र्यांना संपर्क साधून त्यांचे म्हणणे मांडले आणि सदर नित्योपचार पूर्ववत झाले. वारकर्यांचा हा विठ्ठलभक्तीचा आदर्श म्हणजे शौर्य आहे बांधवांनो ! आज अशा धर्मविरोधी कृत्यांच्या विरोधातील शौर्याची पारायणे झाली पाहिजेत.
ख.अशाच प्रकारे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही ३ ते ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या देवस्थान समितीकडे पश्चिम महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांतील ३ सहस्र ६७ मंदिरे आहेत. या विरोधात सनातनने मोर्च्याद्वारे जनजागृती करून हिंदूंना संघटित केले, परिणामी मुख्यमंत्र्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
१०. हिंदूंनो, संघटित व्हा !
हिंदूंनो, देवळांतील सगळा पैसा, या देवळांची भूमी देवस्थानची म्हणजे कुणाची आहे ? हिंदूंचीच ना ! हिंदु भाविकांनी केलेल्या अर्पणाच्या पैशावर डोळा ठेवून काँग्रेसच्या काळात राज्यातील देवळांचे सरकारीकरण झाले. सरकारीकरण झालेले श्रीसिद्धीविनायक मंदिर, शिर्डीचे साई मंदिर येथील पैसा अहिंदूंना खैरात म्हणून वाटला जातो. सरकारीकरण झालेल्या सगळ्या देवळांची हीच दुरवस्था आहे. मग या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आपण हिंदू म्हणून संघटित झाले व्हायला नको का ? आज केवळ देवळे हीच हिंदु धर्माची आधारशीला शिल्लक आहे. आपल्या देवळांविषयी सजग रहाणे, आपल्या श्रद्धास्थानांविषयी सजग रहाणे, त्यासाठी आपले शौर्य दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे. आपण देवळांच्या सरकारीकरणाच्या विरोधात संघटित झाले पाहिजे. जोपर्यंत ही देवळे भक्तांच्या ताब्यात दिली जात नाहीत, तोपर्यंत आपण निकराचे शौर्य दाखवण्याची, प्रतिकारक्षम रहाण्याची आणि संघटित रहाण्याची गरज आहे; कारण
– आम्ही संघटित झालो, तर भारतात सर्वत्र होणार्या पाकिस्तानवाद्यांच्या दंगली तेथेच थोपवता येतील !
– आम्ही संघटित झालो, तर देशात धर्मांतरबंदी किंवा गोहत्याबंदी करण्याची वेळच उद्भवणार नाही !
– आम्ही संघटित झालो, तर आमच्या माता-भगिनींकडे वक्रदृष्टीने पहाण्याचेे धाडस बलात्कार्यांमध्ये होणार नाही !
– आम्ही संघटित झालो, बलशाली झालो, तर आणि तरच येणार्या आयएस्आयएस्सारख्या भयावह आतंकवाद्यांच्या संकटांचा सामना करू शकू !
११. संतांच्या मार्गदर्शनाखाली संघटित व्हा !
आज देश संक्रमणावस्थेतून जात आहे. अशा संकटकाळात ध्येयवादी तरुणांचे संघटन करणे आवश्यक आहे; मात्र ते संघटन संतांच्या मार्गदर्शनाखाली झाले पाहिजे. आज राष्ट्र टिकले, तर समाज टिकेल आणि समाज टिकला, तर आपण टिकू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने कार्यरत झाले पाहिजे. मी एकटा काय करणार?, असे म्हणून गप्प बसू नका ! असे अनेक एकटे एकत्र आले, तर राष्ट्रोद्धाराला वेळ लागणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, आपला दोष आपण भव्य-दिव्य असे काही करत नाही, यात नसून आपल्या आवाक्यातीलही आपण करत नाही, यात आहे. तुम्ही जेथे आहात, तेथे राष्ट्र आणि धर्म यांसाठी प्रयत्न करा ! स्वतः साधना करा, इतरांना करण्यास सांगा !
आज सहस्रो युवक सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करून राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी तन, मन अन् धन यांनी समर्पित झाले आहेत. ध्येयवादी तरुणांमध्ये त्यागाची प्रेरणा निर्माण करण्यात सनातन संस्था यशस्वी झाली आहे, हे सांगतांना मला सार्थ अभिमान वाटतो. आपल्यालाही साधना म्हणून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करायचे असेल, तर सनातन संस्थेला अवश्य संपर्क साधा ! सनातन संस्थेच्या sanatan.org या संकेतस्थळाला भेट द्या ! सनातन प्रभातचे वाचन करा. वर्गणीदार बना !
हिंदु धर्मशास्त्रात सांगितले आहे की, वीर भोग्या वसुंधरा । म्हणजे जे वीर असतात, जे शौर्य गाजवतात, तेच या वसुंधरेवर, पृथ्वीवर राज्य करू शकतात. आजवरचा भारतियांचा जाज्वल्य इतिहास आम्हा सर्व हिंदूंना शौर्याचीच हाक देत आहे. धर्मासाठी किमान एक घंटा तरी द्या ! कारण धर्मो रक्षति रक्षितः । असे शास्त्रवचन आहे. म्हणजेच धर्माचे आपण रक्षण केले, तर धर्म म्हणजे ईश्वर आपले रक्षण करतो. उठा ! जागे व्हा ! आणि शूरतापूर्वक धर्मरक्षणार्थ कृतीशील व्हा !