नागपूर येथील स्वयंभू, २५० वर्षांहून अधिक प्राचीन आणि विदर्भातील अष्ट गणेशांपैकी एक असलेला टेकडीचा गणपति !

नागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर ! मंदिरात झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्यापाशी असलेली गणेशमूर्ती म्हणजेच टेकडीचा गणपति होय !

महाल, नागपूर येथील जागृत श्री गणपति मंदिर !

नागपूर येथील महाल भागात श्री गणपतीचे प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे. नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार श्री. मधुसूदन ताम्हणकर यांच्या घरात हे मंदिर आहे. येथील शमी वृक्ष मूळ मंदिरापासून लांब आहे.

प्रभु श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या रामटेक (जिल्हा नागपूर) येथील प्राचीन अष्टदशभुज श्री गणेशमूर्ती !

रामटेक गडाच्या पायथ्याशी स्थित या मंदिरात अठराभुजा असलेली साडेचार ते पाच फूट उंच, संगमरवरी दगडाची वैशिष्ट्यपूर्ण अतीप्राचीन अशी ही श्री गणेशमूर्ती आहे. तिला अष्टदशभुज असे संबोधतात.

वसिष्ठऋषींनी स्थापन केलेली केळझर (जिल्हा वर्धा) येथील ‘वरद विनायक’ श्री गणेशमूर्ती !

वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर हे नागपूरहून ५२ किमी अंतरावर असून टेकडीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे.

साक्षात् श्रीवामनावताराने स्थापन केलेली अदासा (जि. नागपूर) येथील शमी विघ्नेश्‍वराची श्री गणेशमूर्ती !

अदासा येथील श्री गणेशमूर्ती ही स्वयंभू असून तिची उंची १२ फूट, तर रुंदी ७ फूट आहे. हे मंदिर १ सहस्र वर्षांहून अधिक प्राचीन असून विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक आहे.

ईश्‍वर असल्याची साक्ष देणारे चित्तूर (आंध्रप्रदेश) येथील कनिपकम् विनायक मंदिर !

आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकम् विनायक मंदिर हे स्वयंभू गणेशमूर्ती आणि अनेक आख्यायिका यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. चोल वंशाच्या राजाने ११व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विजयनगरच्या राजाने वर्ष १३३६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील त्रिनेत्र श्री गणेश मंदिराची वैशिष्ट्ये

समुद्र सपाटीपासून २ सहस्र फूट उंचावर असलेल्या रणथंभोरच्या जंगलातील एका डोंगराच्या कड्यातून हा स्वयंभू गणपति प्रकट झाला आहे.

मोरगावचा मयुरेश्‍वर : भूलोकात अधिक आनंद देणारे स्थान !

मोरगाव पृथ्वीलोकात असूनही स्वर्गापेक्षा अधिक पवित्र आणि शक्तीशाली आहे. ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे हे मोरगाव क्षेत्र आहे.

भक्तांच्या मनात भाव आणि भक्ती निर्माण करणारा श्री चिंतामणीचा महिमा !

यवतमाळपासून २३ कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र कळंब गावातील प्रसिद्ध श्री चिंतामणि मंदिर हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

थेऊर येथे स्थापन केलेला चिंतामणि (अष्टविनायकांपैकी एक गणपति) !

महर्षि गृत्समदांनी श्री गणेशाची स्थापना केली. श्री क्षेत्र थेऊर (जिल्हा पुणे) येथे स्थापलेल्या श्री गणेशाचे नावही चिंतामणि हेच आहे. हे क्षेत्र आज अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध क्षेत्र आहे.