वसिष्ठऋषींनी स्थापन केलेली केळझर (जिल्हा वर्धा) येथील ‘वरद विनायक’ श्री गणेशमूर्ती !

वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर हे नागपूरहून ५२ किमी अंतरावर असून टेकडीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे.

साक्षात् श्रीवामनावताराने स्थापन केलेली अदासा (जि. नागपूर) येथील शमी विघ्नेश्‍वराची श्री गणेशमूर्ती !

अदासा येथील श्री गणेशमूर्ती ही स्वयंभू असून तिची उंची १२ फूट, तर रुंदी ७ फूट आहे. हे मंदिर १ सहस्र वर्षांहून अधिक प्राचीन असून विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक आहे.

नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन

सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्चितच लाभ होतो.

कृष्णद्वैपायन वेदव्यासांचे मनोवैज्ञानिक चातुर्य आणि त्यांची महानता !

सनातन धर्मात वेद-उपनिषदांसह अनेकानेक ग्रंथांमध्ये अध्यात्म आणि तत्त्वज्ञान खूप विस्ताराने सांगितले गेले आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि तिचे घटक, विभिन्न देवता तसेच ईश्‍वर म्हणजे काय ? देवतांना कसे प्रसन्न करून घ्यायचे आणि त्यामुळे काय मिळते ?

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण पैलू !

‘श्रीकृष्णाचे पालक पिता नंद हे ‘आभीर’ जातीचे होते. त्यांना आज ‘अहीर’ या नावाने ओळखले जाते. श्रीकृष्णाच्या जन्मदात्या पित्याचे नाव वसुदेव होते.

अमृतवाणी भाग – ३ या ग्रंथातील निवडक लिखाण

पृथ्वीच्या उत्पत्ती अगोदर परमेश्‍वर ! या अवकाशामध्ये नुसती हवाच वहात होती. त्या हवेची प्रचंड वादळेही निर्माण होत होती. चक्रीवादळामध्ये हवा गोलाकार फिरायची. त्या गोलाकार हवेतून हं ऽ ऽ ऽ ऽ हं ऽ ऽ ऽ ॐ असा ध्वनी येत असे.

रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यास काय करावे ?

७.८.२०१७ च्या रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असून या ग्रहणाचे वेध दुपारी १ वाजल्यापासून ग्रहणमोक्षापर्यंत पाळावेत. वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील…

महान संत विसोबा खेचर यांनी शिष्य नामदेवांना शिकवणे

पांडुरंगाच्या आज्ञेनुसार नामदेव महाराज विसोबा खेचर यांना भेटण्यासाठी गेले. एका ज्योर्तिलिंग मंदिरात त्यांचे सद्गुरु विसोबा खेचर पाय पसरून बसले होते. त्यांची अवस्था पुढीलप्रमाणे होती : एका वृद्ध पुरुषाप्रमाणे त्यांच्या अंगाला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून पू वहात होता.

धर्मसम्राट करपात्र स्वामीजी यांचे अलौकिक कार्य !

धर्मसम्राट करपात्र स्वामीजी यांच्याविषयी त्यांचे शिष्य गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सांगितलेला संक्षिप्त जीवनपट येथे देत आहोत.

हिंदु धर्मप्रसारासाठी जीवनभर क्षणन्क्षण वेचणारे नगर (महाराष्ट्र) येथील महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !

गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी हे उत्तरप्रदेशातील महान संत धर्मसम्राट करपात्री स्वामीजी यांचे शिष्य ! गुरुदेवांनी पुणे विद्यापिठातून ‘डॉक्टरेट’ची पदवी घेतली होती. त्यांनी जीवनातील बहुतांश काळ हा हिमालयात व्यतीत केला