ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगण्याच्या पद्धती आणि प्रारब्धावर मात करण्यासाठी साधना अन् क्रियमाणकर्म यांचे महत्त्व

मागील जन्मांतील साधनेमुळे व्यक्तीला जन्मतःच ज्योतिष विद्येचे ज्ञान असते. ज्योतिषशास्त्राची केवळ तोंडओळख झाल्यास व्यक्तीला त्यातील सर्व बारकाव्यांचा आपोआप बोध होऊ लागतो.

जन्मकुंडली, हस्तसामुद्रिक आणि पदसामुद्रिक यांतील भेद

‘हात आणि पाय यांवरील रेषांचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी असल्यामुळे त्यांना ‘कर्मरेषा’ असे संबोधले जाते. क्रियमाण कर्म केल्यामुळे कर्मरेषांमध्ये सूक्ष्म-पालट होऊन कालांतराने हे सूक्ष्म-पालट दृश्य स्वरूपात स्थुलातून दिसू लागतात.