एर्नाकुलम् (केरळ) येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

एर्नाकुलम् (केरळ) : येथील काक्‍कनाड भागातील ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्‍या सदस्‍यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’, या विषयावर व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते. सनातन संस्‍थेच्‍या वतीने हे व्‍याख्‍यान सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन् यांनी दिले.

श्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन्

या वेळी सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन् यांनी ‘अध्‍यात्‍माची आवश्‍यकता, मंदिरात दर्शन घेण्‍याची योग्‍य पद्धत, कुलदेवतेची पूजा का आणि कशी करावी ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या व्‍याख्‍यानाचा लाभ ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्‍या अनेक सदस्‍यांनी घेतला.

Leave a Comment