महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे ४०० हून अधिक प्रदर्शन कक्ष !

प्रदर्शन कक्षांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुंबई – महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत, शहरांत आणि ग्रामीण भागांत ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे ४०० हून अधिक कक्ष लावण्यात आले होते. त्याला भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शन कक्ष उभारण्यात आणि सनातनच्या ग्रंथांचा प्रसार करण्यात धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांचा सक्रीय सहभाग होता. सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त काही ठिकाणच्या शिवमंदिरांची स्वच्छता करण्यात आली, तर काही मंदिरांमध्ये ध्वनीक्षेपकावर ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप लावण्यात आला होता. महाशिवरात्रीचे शास्त्र फलकांवर लिहून त्याची प्रसिद्धी करण्यात आली. काही ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. शिवाच्या पूजेविषयी शास्त्रोक्त माहिती असलेली भित्तीपत्रके मोठ्या प्रमाणात लावण्यात आली होती.

सनातनच्या या ग्रंथप्रदर्शनाला विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पहार्‍यासाठी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनीही ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली.

वांद्रे येथील प्रदर्शन कक्षाला भेट देतांना (उजवीकडे) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, समवेत सनातनचे श्री. नंदकुमार कोतवाल

 

साकीनाका (चांदिवली) येथे ग्रंथप्रदर्शनाला भेट देणारे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे (उजवीकडे) यांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट दिले.

 

यशोधननगर (ठाणे) येथील ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथांविषयी जाणून घेतांना (डावीकडे) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक

Leave a Comment