अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्‍थेविषयी काढलेले गौरवोद़्‍गार !

१. हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा उद़्‍घोष करणार्‍या सनातन संस्‍था
आणि हिंदु जनजागृती समिती  एकमात्र ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

सनातन संस्‍थेशी जोडलो गेल्‍यावर ‘आम्‍ही आमच्‍या मातृसंस्‍थेत आलो आहोत’, असे वाटले. येथे आमच्‍या मनातील भावना व्‍यक्‍त करण्‍याची संधी देण्‍यात आली. हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा उद़्‍घोष करणार्‍या सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती या एकमात्र संघटना आहेत. हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या या ध्‍येयामुळे मी आणि माझे वडील या संघटनांकडे आकर्षित झालो.

२. आम्‍हाला मिळालेले यश, ही परात्‍पर गुरु
डॉ. आठवले यांची कृपा ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

आम्‍हाला जे यश आणि कीर्ती मिळाली, ती परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या आशीवार्दामुळे, असे मी आणि माझे वडील मानतो. गुरुदेवांची साधना आणि तप यांमुळेच आमचे कार्य निर्विघ्‍नपणे पार पडले. काशी विश्‍वनाथ मंदिराच्‍या खटल्‍यात आतापर्यंत आम्‍हाला मिळालेले यश हे सनातन संस्‍था, परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांचे यश आहे.

३. प्राण गेला, तरी खटल्‍यातून मागे हटणार नाही ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

काशी विश्‍वनाथ मंदिराच्‍या खटल्‍यातील ५ याचिकांपैकी मी माघार घेतली असल्‍याची अफवा परसवण्‍यात आली. खोट्या बातम्‍या देण्‍यात आल्‍या. प्राण गेला तरी या खटल्‍यातून मी मागे हटणार नाही.

 ४. हिंदू एकत्रित येऊन काशी विश्‍वनाथ मंदिरात पूजा
करतील तो दिवस दूर नाही ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

रामनाथी – ज्ञानवापी मशिदीतील वजूखान्‍यातील (नमाजाच्‍या आधी हात-पाय धुण्‍याच्‍या ठिकाणी असलेले) पाणी सलग तीन दिवस काढल्‍यावर तेथे भव्‍य शिवलिंग आढळले. ज्‍या वेळी मला त्‍या भव्‍य शिवलिंगाचे दर्शन झाले, त्‍याच वेळी मी निश्‍चय केला की, यापुढे हिंदूंच्‍या आराध्‍य देवतांचा अवमान होऊ देणार नाही. न्‍यायालयानेही शिवलिंग आढळल्‍याचा परिसर बंद (सील) करण्‍याची अनुमती दिली. या विरोधात मुसलमान सर्वोच्‍च न्‍यायालयात गेले, तेथेही या निर्णयाला योग्‍य ठरवण्‍यात आले. हिंदू एकत्रित येऊन काशी विश्‍वनाथ मंदिरात पूजा करतील, तो दिवस दूर नाही, असा विश्‍वास हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिसचे प्रवक्‍ते आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांनी व्‍यक्‍त केला. दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या उद़्‍बोधन सत्रात ‘प्‍लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्‍ट’ची भीषणता आणि काशी-मथुरा मुक्‍ती आंदोलन’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता (पू.) हरि शंकर जैन, अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी. आणि श्री. एम्. नागेश्‍वर राव हे उपस्‍थित होते.

या वेळी अधिवक्‍ता विष्‍णु हरि जैन म्‍हणाले,

१. ‘प्‍लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्‍ट’द्वारे हिंदूंचा आवाज दाबण्‍यात आला. तत्‍कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी वर्ष १९९१ मध्‍ये केलेल्‍या या कायद्यामुळे १५ ऑगस्‍ट १९४७ पूर्वीची धार्मिक स्‍थळे ज्‍या स्‍वरूपात होती, त्‍याच स्‍थितीत ठेवण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

२. या कायद्याच्‍या अंतर्गत कोणत्‍याही धार्मिक स्‍थळाविषयी न्‍यायालयात खटला प्रविष्‍ट करता येऊ शकत नाही. असे असतांना अयोध्‍येतील श्रीराममंदिराविषयीचा खटला न्‍यायालयाने प्रविष्‍ट करून घेतला. हिंदू जागृत झाल्‍यामुळेच श्रीराममंदिराचा खटला न्‍यायालयाने प्रविष्‍ट करून घेतला.

३. श्रीराममंदिराचा खटला न्‍यायालयात प्रविष्‍ट केला जाऊ शकतो, तर मोगलांनी मशिदींमध्‍ये रूपांतरित केलेल्‍या ४० सहस्र मंदिरांचा खटला न्‍यायालयात का प्रविष्‍ट होऊ शकत नाही ? यासाठी हिदूंनी आवाज उठवणे आवश्‍यक आहे.

४. या कायद्याच्‍या विरोधात आम्‍ही कायदेशीर मार्गानेच लढा देत आहोत. या कायद्याच्‍या कलम ४ नुसार १५ ऑगस्‍ट १९४७ या वेळी धार्मिक स्‍थळाचे जे स्‍वरूप होते, त्‍याच स्‍वरूपात ते रहाणार असेल, तर ‘त्‍यावेळी त्‍या धार्मिक स्‍थळाचे स्‍वरूप काय होते ?’ हे प्रथम निश्‍चित करायला हवे.

५. ज्‍याप्रमाणे एखाद्या मशिदीमध्‍ये मूर्ती ठेवली, तर त्‍या मशिदीचे मंदिर होऊ शकत नाही, त्‍याप्रमाणे मंदिरात नमाजपठण केले म्‍हणून मंदिराचे धार्मिक स्‍वरूप पालटू शकत नाही. हिंदु कायद्यानुसार एखाद्या मंदिराची संपत्ती ही त्‍या मंदिरातील देवतेची आहे. या कायद्यानुसार मंदिराची सर्व संपत्ती ही शेवटपर्यंत त्‍या देवतेचीच रहाते.

६. एकीकडे वफ्‍क कायद्याद्वारे वफ्‍क मंडळाला कोणतीही भूमी कह्यात घेण्‍याचा अधिकार देण्‍यात आला आहे, तर दुसरीकडे ‘प्‍लसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्‍ट’द्वारे मंदिरांचे इस्‍लामिक धार्मिक स्‍थळात झालेला पालट कायम ठेवण्‍यात आला आहे. या दोन्‍ही कायद्यांची तुलना केल्‍यास धर्मनिरपेक्षतेच्‍या आडून हिंदूंचे कसे दमन केले जात आहे, हे लक्षात येईल.

७. मी आणि माझे वडील पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन यांनी या कायद्याला सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले आहे. या कायद्याद्वारे मंदिरांविषयी न्‍यायालयात जाण्‍याचा हिंदूंचा अधिकार काढून घेण्‍यात आला आहे. हा काळा कायदा केंद्र सरकारने रहित करायला हवा. यासाठी अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचे मोठे योगदान ठरेल. जोपर्यंत हा कायदा रहित केला जात नाही, तोपर्यंत हिंदूंपुढे मोठे आव्‍हान आहे.

Leave a Comment