नीमच (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

 

नीमच (मध्यप्रदेश) – येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (चतुर्थ सिग्नल बटालियन) सैनिकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे श्री. किरण नोगिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रवचनासाठी कमांडंट श्री. सूरजपाल वर्मा, त्यांचे अधिकारी आणि सैनिक उपस्थित होते. उपस्थित सैनिकांनी अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करून घेत संस्थेच्या संकेतस्थळाविषयी जाणून घेतले. या प्रवचनाचा १०० हून अधिक सैनिकांनी लाभ घेतला. या प्रवचनाचा समारोप करतांना कमांडंट श्री. सूरजपाल वर्मा यांनी संस्थेने केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याविषयी उपस्थितांना सांगितले.

Leave a Comment