नवी देहली येथे सनातनच्या साधकांनी मंदिर स्वच्छता करून हिंदु राष्ट्रासाठी केली प्रार्थना !

नवी देहली – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १८ मे या दिवशी कलकाजी, अलकनंदा येथील श्री संतोषीमाता मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या सेवेमध्ये मंजुला कपूर, नुपूर भट्टाचार्य, कु. टुपूर भट्टाचार्य, साधना सत्संगातील साधिका निधी सेठ आणि सुधा अरोरा, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वाचक श्री. कृपाल सिंह आणि यांचे कुटुंबीय सरोजनी सिंह, पुत्र कु. आशिष आणि कु. अभिजित यांनी सहभाग घेतला.

अलकनंदा येथील श्री संतोषीमाता मंदिराची स्वच्छता

 

रघुनाथ मंदिर येथे देवतांना साकडे आणि हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना

रघुनाथ मंदिर येथे देवतांना साकडे आणि हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना

यानंतर कलकाजी, अलकनंदा येथील रघुनाथ मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालून प्रार्थना करण्यात आली. या सेवेत मंजुला कपूर, साधना सत्संगातील साधिका रितिका मित्तल आणि सुधा अरोरा, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वाचक श्री. कृपाल सिंह यांनी सहभाग घेतला. या वेळी सुधा अरोरा यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने उपस्थितांना प्रार्थना सांगितली.

Leave a Comment