सनातनचे हितचिंतक प्रदीप किणीकर यांच्याकडून सांगली येथील महात्मा गांधी ग्रंथालयासाठी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित २२ ग्रंथ भेट !

ग्रंथ भेट देण्याच्या प्रसंगी डावीकडून सर्वश्री श्रीकृष्ण जोशी, प्रदीप किणीकर, शरद पाटील, शरद शहा, नंदकुमार जाधव, विश्वस्त हसन समलेवाले

सांगली – सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. प्रदीप किणीकर यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले २२ ग्रंथ (२ सहस्र ४० रुपये) प्रायोजित करून ते महात्मा गांधी ग्रंथालयासाठी भेट म्हणून दिले. या ग्रंथांमध्ये अग्निहोत्र, स्वभावदोष निर्मूलन, प्रथमोपचार, पाल्याचे उत्तम संगोपन आणि विकास यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ यांचा समावेश आहे. ग्रंथ भेट देतांना वाचनालयाचे कार्यवाह श्री. शरद सूरगोंडा पाटील, ग्रंथपाल श्री. दिगंबर नाना सूर्यवंशी, सदस्य श्री. शरद गोपाळदास शहा, श्री. नंदकुमार रघुनाथराव जाधव, विश्वस्त हसन अकबर समलेवाले, तसेच सनातन संस्थेच्या सौ. शितल जोशी आणि श्रीमती मधुरा तोफखाने उपस्थित होत्या. हे ग्रंथ वाचनालयास प्रदान करण्यात ग्रंथपाल श्री. दिगंबर सूर्यवंशी यांनी चांगले सहकार्य केले. (सनातन संस्थेच्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात घेऊन ते ग्रंथालयास देणार्‍या सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. प्रदीप किणीकर यांचे अभिनंदन ! यामुळे समाजातील अनेक जिज्ञासूंपर्यंत हे ज्ञान पोचण्यास साहाय्य होईल ! इतरही यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या परिसरातील वाचनालयास सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ भेट देऊन धर्मकार्यात सहभागी होऊ शकतात ! – संपादक)

श्री. प्रदीप किणीकर हे घाऊक औषध व्यापारी असून ते अनेक वर्षांपासून सनातन संस्थेशी जोडलेले आहे. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते आहेत. ते अनेक वर्षांपासून धर्मकार्यासाठी आर्थिक साहाय्य करत आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या वैद्यकीय साहाय्य उपक्रमात त्यांनी मोठ्या प्रमाणात औषधे विनामूल्य मिळवून दिली होती.

 

सनातन संस्थेचे ग्रंथ उपयुक्त असून आदर्श आणि सुसंस्कृत नागरिक
घडवण्यासाठी ते मोलाची भूमिका पार पाडू शकतात ! – महात्मा गांधी ग्रंथालय

या संदर्भात महात्मा गांधी ग्रंथालयाच्या वतीने सनातन संस्थेला पत्र देण्यात आले आहे. ‘विविध विषयांवरील उपयुक्त, आदर्श आणि सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी सदर ग्रंथ मोलाची भूमिका पार पाडू शकतात. वाचकांचे मनोबल उंचावणारे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे हे ग्रंथ आहेत. आपण दिलेल्या ग्रंथ भेटीमुळे आमचा ग्रंथ संग्रह वृद्धींगत होण्यास साहाय्य होईल. आपला उपक्रम स्तुत्य असून वाचन चळवळ वाढीसाठी प्रेरणा देणारा आहे’, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment