ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला गोवा राज्य आणि सोलापूर (महाराष्ट्र) येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ हे पुढील अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त आहेत. ही अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने हे राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ म्हणून राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ग्रंथांचा प्रसार होत असून समाजातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये या पश्चिम महाराष्ट्रात या अभियानाच्या माध्यमातून साधना कशी होईल ? या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. या वेळी सर्वच स्तरांतून त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

या लेखात गोवा राज्य आणि सोलापूर (महाराष्ट्र) येथील साधकांचे अनुभव आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग पाहूया.

सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

 

१. गोवा

१. सध्याच्या स्थितीत समाजाला चांगल्या संस्कारांची आवश्यकता असल्याने वाचनालयात
ठेवण्यासाठी ग्रंथांची मागणी करणारे डिचोली, गोवा येथील भाजप नेते आणि नगराध्यक्ष श्री. कुंदन फळारे !

डिचोली, गोवा येथील नगराध्यक्ष आणि भाजप नेते श्री. कुंदन फळारे अन् जिल्हा पंचायत सदस्य यांना भेटल्यानंतर ग्रंथांविषयी माहिती सांगितली. त्यांना ग्रंथातील माहिती पुष्कळ आवडली. त्यांनी वाचनालयात ठेवण्यासाठी ग्रंथांची मागणी केली. या वेळी फळारे म्हणाले, ‘‘सध्याच्या स्थितीत समाजाला चांगल्या संस्कारांची आवश्यकता आहे. आपली मुले संस्कारहीन झालेली आहेत. त्यामुळे ती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. तुम्ही चांगले कार्य करत आहात.’’

२.सनातनचे ग्रंथ विकत घेऊन दिवाळीमध्ये ‘सनातन पंचांग’ कर्मचार्‍यांना भेट देण्याची सिद्धता दर्शवणारे उद्योगपती श्री. राजपाल ढाका !

‘गोवा येथील उद्योगपती श्री. राजपाल ढाका यांना ग्रंथांच्या संदर्भात भेटण्यास गेल्यावर त्यांनी त्यांच्याकडील कर्मचार्‍यांना एकत्र केले आणि त्यांना ग्रंथांची माहिती सांगण्यास सांगितले. त्यांनी सनातनचे ग्रंथ विकत घेतले आणि दिवाळीमध्ये त्यांच्या कर्मचार्‍यांना ‘सनातन पंचांग’ भेट देण्याच्या संदर्भात सिद्धता दर्शवली.

 

२. सोलापूर (महाराष्ट्र)

१.‘ग्रंथांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती असल्याने त्वरित
ग्रंथांचे संच विकत घेणारे सोलापूर येथील ‘इंडियन मॉडेल स्कूल’चे अध्यक्ष श्री. अमोल जोशी !

सोलापूर येथील ‘इंडियन मॉडेल स्कूल’चे अध्यक्ष श्री. अमोल जोशी यांनी सनातनच्या ग्रंथांविषयी सर्व माहिती जाणून घेऊन त्वरित ग्रंथांचे संच विकत घेतले. या वेळी श्री. अमोल जोशी म्हणाले, ‘‘ग्रंथांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती आहे. ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची विचारसरणी ‘निधर्मी’ होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ‘जे.एन्.यू.’सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा विद्यार्थ्यांपर्यंत सनातनच्या ग्रंथातील माहिती पोचवणे आवश्यक आहे.’’

२.विविध विषयांवरील ग्रंथ विकत घेणार्‍या आणि गावातील
वाचनालयातही ग्रंथ ठेवण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या सोलापूर येथील सौ. ढेकळे !

सोलापूर येथील श्री. बालाजी ढेकळे आणि त्यांच्या पत्नी सौ. ढेकळे यांना सनातनचे ग्रंथ दाखवल्यानंतर त्यांना ग्रंथ पाहून पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी सौ. ढेकळे म्हणाल्या, ‘‘मला ग्रंथ हवेच होते. मी तुमची वाटच पहात होते.’’ त्यांनी विविध विषयांवरील अनेक ग्रंथ विकत घेतले आणि त्यांच्या गावाकडील वाचनालयातही ग्रंथ ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

३.श्री. विनोद सिन्नूरकर हे सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्यास आल्यावर त्यांनी
महाविद्यालयात बोलावून तेथील सहकार्‍यांना एकत्र करून ग्रंथांविषयी माहिती सांगण्यास सांगणे

सोलापूर येथील श्री. विनोद सिन्नूरकर हे सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले होते. त्यांना सनातनच्या ग्रंथांचे विषय पुष्कळ आवडले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘हे ग्रंथ इतके चांगले आहेत की, ते सर्वांपर्यंत पोचायला हवेत.’’ त्यानंतर त्यांनी साधकांना त्यांच्या महाविद्यालयात बोलावले आणि तिथे असणार्‍या त्यांच्या ५ सहकार्‍यांना एकत्र करून ग्रंथांविषयी माहिती सांगण्यास सांगितली. त्या वेळी त्या सर्वांनी सांगितले की, ‘आम्ही ग्रंथांची मागणी करतो आणि यापुढे तुमचे ग्रंथ प्रदर्शन जिथे असेल, तेथील पत्ता आणि वेळ कळवा. आम्ही तिथे भेट देऊ.’

४.‘सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व समजावे’, यासाठी ‘ऑनलाईन’ बैठकीत ग्रंथांचे
महत्त्व सांगितल्यावर त्यांनी आपत्कालीन ग्रंथ मालिकेतील २२५ ग्रंथांची मागणी करणे

बार्शी (सोलापूर) येथील सनातनचे साधक श्री. लक्षण रामगुडे यांनी त्यांच्या मित्रांना सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व समजावे, यासाठी एका ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ग्रंथांचे महत्त्व सांगितल्यावर सर्वांनी आपत्कालीन ग्रंथ मालिकेतील एकूण २२५ ग्रंथांची मागणी केली.

५.सोलापूर येथील धर्मप्रेमी उद्योजक श्री. साई क्षीरसागर यांनी महिला ग्राहकांना अन्य भेटवस्तू देण्यापेक्षा
सनातन संस्थेचे १०० लघुग्रंथ विकत घेणे आणि एका उद्योजकांनी त्यांच्या दुकानाचे विज्ञापन देण्याची इच्छा व्यक्त करणे

सोलापूर येथील धर्मप्रेमी उद्योजक श्री. साई क्षीरसागर यांना ग्रंथांविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी त्यांच्याकडे येणार्‍या महिला ग्राहकांना अन्य भेटवस्तू देण्यापेक्षा सनातन संस्थेचा लघुग्रंथ देण्याची इच्छा व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी भेट देण्यासाठी १०० ग्रंथ विकत घेतले. काही महिलांना भेट देण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ या ग्रंथांचीही मागणीही त्यांनी केली. या वेळी त्यांनी त्यांच्या परिचयातील अन्य उद्योजकांनाही ग्रंथांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक दिला. त्यातील एका उद्योजकांनी हिंदी ग्रंथांच्या संचांची मागणी केली, तसेच एका लघुग्रंथावर त्यांच्या दुकानाचे विज्ञापन देण्याची इच्छा व्यक्त केली.’

६.‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ यांसाठी सोलापूरमधील लोकप्रतिनिधींचा सहभाग !

अ. ‘परांडा (जिल्हा धाराशिव) येथील भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हृदयाचे (बायपास) शस्त्रकर्म झाल्यामुळे ते शक्यतो कुणालाही भेटत नव्हते; मात्र ते साधकांना भेटले आणि म्हणाले, ‘‘ग्रंथांचे विषय चांगले आहेत. हे ग्रंथ समाजापर्यंत पोचवण्यासाठी मी अधिकाधिक साहाय्य करीन. आमदार निधीतून वाचनालयांना ग्रंथ देण्याचा प्रयत्न करीन.’’

आ. सोलापूरच्या महापौर आणि भाजपच्या सौ. श्रीकांचना यन्नम यांच्या यजमानांना भेटल्यानंतर त्यांनी सर्व ग्रंथांची सूची पाहून महापौरांच्या स्वीय सचिवास अंदाजपत्रक सिद्ध करण्यास सांगितले, तसेच ‘भाजपच्या कार्यालयासह पूर्व भागातील ८ वाचनालयांत ग्रंथ ठेवूया आणि वाचनालयात ‘सनातनचे ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध आहेत’, असा फलक लावूया’, असेही त्यांनी सांगितले.

इ. माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी सनातनच्या ग्रंथांची सूची पाहिली आणि ते म्हणाले, ‘‘वाचनालयांकडून ग्रंथांचे मागणीपत्र आणि त्या समवेत ग्रंथांची सूची जोडून माझ्याकडे द्या. जेवढ्या वाचनालयांची मागणी येईल, त्या सर्व वाचनालयासाठी आमदार निधीतून ग्रंथांसाठी रक्कम उपलब्ध करून देण्याचे मी नियोजन करतो.’’ (२४.१०.२०२१)

– सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

Leave a Comment