सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना होणारे विविध प्रकारचे त्रास आणि त्यांना मिळणार्‍या ज्ञानाची वैशिष्ट्ये !

Article also available in :

लेख क्रमांक :

मागील लेख क्रमांक ८ वाचण्यासाठी भेट द्या. आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी आणि त्याच्या रक्षणासाठी ऋषींनी केलेले प्रयत्न

ज्ञानप्राप्तकर्त्या :  कु. मधुरा भोसले

विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्याला ज्ञानशक्तीचे पाठबळ मिळण्यासाठी ईश्वर सनातन संस्थेकडे ज्ञानशक्तीचा प्रवाह पाठवत आहे. या प्रवाहात ज्ञानशक्तीने ओतप्रोत भरलेले चैतन्यदायी सूक्ष्म विचार ब्रह्मांड पोकळीतून पृथ्वीच्या दिशेने प्रक्षेपित होत आहेत. ज्ञानावतार असलेले परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या कृपेमुळे सनातन संस्था आणि तिच्याशी संलग्न असणार्‍या संस्था यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या काही साधकांना सूक्ष्मातून ईश्वरी ज्ञान प्राप्त होत आहे. या साधकांना सूक्ष्मातून ईश्वराकडून प्राप्त होणारे ज्ञान मिळत असतांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर विविध प्रकारचे त्रास होत आहेत. या त्रासांची विस्तृत माहिती येथे दिली आहे.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 

१. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना पाताळ आणि नरक
यांतील मोठ्या वाईट शक्तींनी त्रास देणे, त्रास देण्याचा उद्देश,
त्रासाचे स्वरूप, त्रासामुळे होणारा परिणाम आणि त्रासाचे प्रमाण

टीप १ – विविध पाताळ आणि नरक येथील मोठ्या वाईट शक्ती यांना ज्ञानसिद्धी प्राप्त झाल्यामुळे त्यांना सूक्ष्म जगतामध्ये ‘विद्वान मांत्रिक’ किंवा ‘गुरुमांत्रिक’ म्हणतात. त्यांचा उद्देश ‘पृथ्वीवर होणार्‍या धर्मसंस्थापनेच्या अवतारी कार्याला विरोध करणे’ हा आहे. त्यामुळे ते ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना त्रास देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ज्ञानशक्तीचे स्रोत असणार्‍या विविध लोकांतील दैवी शक्ती यांच्याशी सूक्ष्मातून ज्ञानयुद्ध करत आहेत.

टीप २ – ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना वाईट शक्तींचा त्रास एकूण ७० टक्के इतक्या प्रमाणात होतो, तर त्यांना विविध लोकांतील दैवी शक्तींचे साहाय्य १०० टक्के होते. हे दोन्ही सारणींची बेरीज पाहिल्यावर लक्षात येते. त्यामुळे ‘ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत असतांना जरी सूक्ष्मातील संघर्षाला सामोरे जावे लागले, तरी त्यांना मिळणारे ज्ञान दैवी असते’, हे ज्ञान वाचल्यावर लक्षात येते. यावरून ‘वाईट शक्तींपेक्षा दैवी शक्तींचे बळ अधिक आहे’, हे सूत्र लक्षात येते.’

कु. मधुरा भोसले

 

२. विविध उच्च लोकांतील उन्नतांनी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना साहाय्य करणे

 

टीप १ – सध्या ईश्वरी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांची पातळी ७० टक्क्यांपेक्षा न्यून असल्यामुळे त्यांना अधिक प्रमाणात महर्लाेकाच्या स्तरावरील ज्ञान मिळत आहे. जेव्हा त्यांची पातळी ७० टक्क्यांहून अधिक होईल, तेव्हा त्यांना जन, तप आणि सत्य या लोकांकडून सूक्ष्मातून ज्ञान अधिक प्रमाणात मिळणार आहे.

टीप २ – श्रीविष्णूचे अंशावतार आणि कलियुगातील ज्ञानावतार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अव्यक्त संकल्पामुळे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या काही साधकांना सूक्ष्मातून ईश्वरी ज्ञान प्राप्त होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या व्यक्त संकल्पामुळे ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाची सत्यता ते पडताळून पहात आहेत आणि त्यामध्ये चैतन्य भरत आहेत.

टीप ३ – ज्ञान आणि कर्म या योगांनुसार ज्ञान प्राप्त करणार्‍या साधकांना ‘सूक्ष्मातून विविध उन्नत किंवा ऋषिमुनी ज्ञान देत आहेत’, अशी अनुभूती येते. भक्तीमार्गानुसार ज्ञान प्राप्त करणार्‍या साधकांना ‘सूक्ष्मातून विविध देवता ज्ञान देत आहेत’, अशी अनुभूती येते.

 

३. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना
धर्म आणि अध्यात्म यांच्या संदर्भातील मिळणार्‍या ज्ञानातील भेद

१. सगुण स्तर
२. निर्गुण स्तर
३. व्यष्टी स्तर
४. समष्टी स्तर
५. तात्त्विक स्वरूप
६. प्रायोगिक स्वरूप

 

कृतज्ञता : ‘देवाच्या कृपेने ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या संदर्भातील वरील ज्ञान मिळाले आणि अध्यात्मातील अनेक पैलू उलगडले’, यासाठी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या / संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment