आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी आणि त्याच्या रक्षणासाठी ऋषींनी केलेले प्रयत्न

लेख क्रमांक :

मागील लेख क्रमांक ७ वाचण्यासाठी भेट द्या. पर्यावरणाची सूक्ष्म स्तरावरील थोडक्यात ओळख आणि पर्यावरण नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी विविध काळात केलेले प्रयत्न

ज्ञाप्राप्तकर्ते : श्री. निषाद देशमुख
संकलक : परात्पर गुरु डॉ. आठवले

अनुक्रमणिका

हे ज्ञान वाचतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध दिवशी अनुभवलेले त्रास

गेल्या १४ वर्षांत ८ वेळा ही ज्ञानाची धारिका वाचण्याचा प्रयत्न केला. ही धारिका प्रथम २५.३.२००७ या दिवशी पाहिल्यावरच तीव्र त्रास जाणवला; म्हणून ही धारिका पडताळली नाही. त्यानंतर २०.१२.२००९, २८.१२.२०११, ९.६.२०१५ आणि २३.११.२०२० या दिवशीही धारिका पुन्हा पाहिली. तेव्हाही ही धारिका पाहिल्यावरच तीव्र त्रास जाणवला; म्हणून धारिका पडताळली नाही. २०.१२.२०२० या दिवशी धारिका पुन्हा पडताळली. धारिका वाचतांना खूप त्रास जाणवल्याने सूत्र क्र. २ च्या पुढील मजूकर पडताळला नाही. त्यानंतर दुसर्‍या एका मासिकातील मजकूर वाचण्यासाठी घेतला; पण ‘तोही वाचू नये’, असे वाटले आणि डोके दुखू लागले. २९.१२.२०२० ला धारिकेकडे बघितल्यावर त्रास झाला. शेवटी २४.१०.२०२१ या दिवशी धारिका पूर्ण वाचता आली अणि त्यातील ज्ञान समजून घेता आले.

२४.१०.२०२१ या दिवशी धारिका पडताळतांना त्यामध्ये धारिका वाचण्यात येणार्‍या अडचणींचे प्रमाण १० टक्के होते. ५ टक्के कठीण भाषा आणि ५ टक्के त्रासदायक (काळी) शक्ती यांमुळे धारिका कळण्यात अडचणी येत होत्या. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हे ज्ञान वाचल्यावर युगायुगांत सूक्ष्मातील युद्ध कसे असते,
याची थोडीफार कल्पना या लेखावरून येईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 

१. प.पू. डॉक्टरांद्वारे सर्वांत अधिक प्रमाणात
आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी होत असल्यामुळे
मोठ्या वाईट शक्तींनी त्यांच्या प्राणदेहावर आक्रमण करणे

अज्ञात शक्ती : ‘आध्यात्मिक पर्यावरणाला लवकरात लवकर आणि अल्प शक्ती वापरून नष्ट करण्यासाठी मोठ्या वाईट शक्तींनी प.पू. डॉक्टरांच्या प्राणदेहावर आक्रमण केले’, असे आपण सांगण्याचे कारण काय ?

धर्मतत्त्व : उन्नत जिवांच्या अस्तित्वामुळेच आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी होऊन आध्यात्मिक स्तरावर बाधा होत नाही. कलियुगात वर्ष १९३० पर्यंत उन्नत संतांची आवश्यक त्या प्रमाणात संख्या होती. त्यामुळे या प्रकारचे संकट उद्भवले नाही अथवा संकट खूप अल्प कालावधीसाठी आले. वर्ष १९३० नंतर उन्नतांची संख्या अल्प झाल्यामुळे मोठ्या वाईट शक्तींनी आध्यात्मिक पर्यावरणावर आक्रमण करण्यास प्रारंभ केला. प.पू. डॉक्टरांद्वारे सर्वांत अधिक प्रमाणात पर्यावरणाची शुद्धी होत असल्यामुळे मोठ्या वाईट शक्तींनी त्यांच्यावर आक्रमण केले.

१ अ. प.पू. डॉक्टर, ऋषी, संत आणि इतर यांच्याद्वारे होणारे आध्यात्मिक पर्यावरणाच्या शुद्धीचे प्रमाण

उन्नत आध्यात्मिक पर्यावरणाच्या शुद्धीचे प्रमाण (टक्के)
१. प.पू. डॉक्टर ३०
२. हिमालयातील सर्व ऋषी ३०
३. ८० टक्के पातळी असलेले सर्व संत २०
४. ७० टक्के पातळी असलेले सर्व संत १०
५. अन्य (क्षुद्र देवता, सूर्य इत्यादी प्रकट देवता) १०
एकूण १००

वरील तक्त्यावरून लक्षात येते की, प.पू. डॉक्टरांद्वारे जेवढे कार्य केले जाते, तेवढे कार्य हिमालयातील सर्व ऋषी मिळून करतात. प.पू. डॉक्टरांवर आक्रमण केल्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना होत असलेला विरोध ३० टक्के अल्प होतो. तसेच मोठ्या वाईट शक्तींनी शक्तीचा केंद्रबिंदू एकाच ठिकाणचा, म्हणजे प.पू. डॉक्टर यांना ठेवल्यामुळे त्यांना शक्ती अल्प प्रमाणात खर्च करावी लागते. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींनी प.पू. डॉक्टरांच्या प्राणदेहावर आक्रमण केले. – धर्मतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.५.२००६, सकाळी ९.२०)

श्री. निषाद देशमुख

वरील माहिती मिळतांना, तसेच तिचे टंकलेखन करतांना मला खूप चांगले वाटून उत्साह जाणवत होता. तसेच सर्व टक्केपण योग्य आहेत, याची मनापासून खात्री वाटली. – श्री. निषाद देशमुख, भोपाळ

(इ.स. २००० पासून माझी प्राणशक्ती सुमारे ३५ टक्के एवढीच आहे. – डॉ. आठवले)

 

२. हिमालयातील ऋषींनी धर्मरक्षणासाठी केलेले कार्य

काळ ऋषींना खर्च कराव्या लागणार्‍या शक्तीचे प्रमाण (टक्के)
१. १९२५-१९३० ५०
२. १९३०-१९४० ३०
३. १९४०-१९४५ ४०
४. १९४५- २००५ ३०

 

३. वर्ष १९२६ ते २००५ या कालखंडात
मोठ्या वाईट शक्तींनी आक्रमणे केल्यावर
ऋषींनी धर्मरक्षणाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या
रक्षणासाठी केलेले कार्य आणि त्याची प्रक्रिया

१९२६-१९३० : मोठ्या वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेले ३० टक्के काळे तंतू योगात्मक क्रियाशक्तीच्या आधारे पृथ्वीच्या वरच्या पट्ट्यावरून मारक शक्तीच्या आधारे हटवले. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना रसातळ ताब्यात घ्यावा लागला.

१९३१-१९३५ : ऋषींनी ब्रह्मांडाच्या वरच्या टोकावर आकाश आणि वरुणदेव यांच्या साहाय्याने विश्वावर सोनेरी कवच प्रक्षेपित केले. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना ब्रह्मांडाच्या वरच्या टोकातून त्रासदायक शक्तीचे मोठे साठे घेणे खूप कठीण झाले.

१९३६-१९४०

१. ऋषींनी मोठ्या वाईट शक्तींच्या जडत्वदर्शक बद्धात्मक सिद्धी आणि तेजोमय ऊर्जा सिद्धी या सिद्धींना नष्ट करणे

१ अ. जडत्वदर्शक बद्धात्मक सिद्धी : हिच्या माध्यमातून मोठ्या वाईट शक्तींना पृथ्वीतत्त्वावर काळ्या तंतूचे प्रक्षेपण करून पृथ्वीमध्ये असलेली उत्पादनक्षमता कमी करणे शक्य होते.

१ आ. तेजोमय ऊर्जा सिद्धी : या सिद्धीच्या माध्यमातून मोठ्या वाईट शक्तींना तेजतत्त्वाच्या दर्शक असलेल्या घटकांवर त्रसादायक लहरींचे प्रक्षेपण करून वातावरणातील उष्णता वाढवून वायूमंडलात तमकणांचे प्राबल्य वाढवणे शक्य होते. ऋषींनी मोठ्या वाईट शक्तींच्या या दोन्ही सिद्धी आपल्या उदयगामीनी तेजाच्या वेगात्मक बळावर नष्ट केल्या. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना पृथ्वीच्या अग्रभागात त्रासदायक शक्ती साठवणे अशक्य झाले. तसेच या सूक्ष्मयुद्धात मोठ्या वाईट शक्तींची एकूण ३० टक्के शक्ती नष्ट झाली. (८.१.२००७, सायंकाळी ६.१६)

२. हिमालयातील ऋषींनी मोठ्या वाईट शक्तींनी भारताच्या अन्नपोकळीत प्रक्षेपित केलेल्या अधोगामी काळ्या तंतूंच्या प्रक्षेपणाला स्थिर करून नष्ट केले. त्यामुळे भारताच्या अन्नपोकळीतील मोठ्या वाईट शक्तींचे सर्वांत मोठे साठे नष्ट झाले.

३. मोठ्या वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या तीव्र आवरणाला ऋषींनी आपल्या शक्तींनी कनिष्ठ स्तरावर आणल्याने मोठ्या वाईट शक्तींना प्राणशक्तीचे शोषण करणे शक्य झाले. धनंजय, म्हणजे दीर्घ वायूमंडलात संचारणारी प्राणऊर्जा आणि वायूमंडलात संचारणारी प्राणऊर्जा यांना इजा करणे मोठ्या वाईट शक्तींना शक्य नव्हते.

१९४१ – १९४५

१. विश्वयुद्धात होत असलेल्या मानव-जीवनाचा र्‍हास टाळण्यासाठी ऋषींनी ३० टक्के शक्ती प्रक्षेपित केल्याने कोटी कोटी लोकांचे जीव वाचले.

२. भूमीच्या गर्भात निर्माण झालेल्या काळ्या तंतूंना नष्ट करण्यासाठी भूमातेला जागृत केले. त्यामुळे व्यक्त स्तरावर त्रासदायक शक्तीच्या साठ्यांवर परिणाम झाला.

३. विश्वयुद्धात प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक पंचकलहरींना ऋषींनी ध्यानातून निर्माण होणार्‍या तेजशक्तीच्या बळावर कृष्णविवराकडे प्रक्षेपण केले. त्यामुळे पूर्ण विश्वावर २० टक्के एवढाच परिणाम झाला.

४. मोठ्या वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या आवरणाला ऋषींनी आपल्या आत्मशक्तीच्या बळावर ३० टक्के तडे दिल्यामुळे चैतन्याचे प्रक्षेपण सतत चालू राहिले.

१९४६ – १९५०

१. भारताच्या फाळणीच्या वेळी सर्वसामान्य जिवांचे रक्षण व्हावे; म्हणून हिमालयातील ऋषींनी मोठ्या वाईट शक्तींवर आक्रमण करून प्रत्यक्ष सूक्ष्मयुद्ध केल्याने मोठ्या वाईट शक्तींची ३० टक्के शक्ती न्यून झाली.

२. मोठ्या वाईट शक्तींनी भारतभूमीत निर्माण केलेल्या काळ्या तंतूंपैकी ५० टक्के तंतूंचा नाश ऋषींनी भूमीतत्त्वाशी संलग्न लहरीत सत्त्वकणांचे प्रक्षेपण करून केला आणि २० टक्के तेज भूमातेला प्रदत्त करून केले.

३. ऋषींनी वायूदेवतेला जागृत केल्याने भारत, तसेच ३० टक्क्यांहून अधिक सात्त्विकता असलेल्या देशांत असलेले विषारी वायूंचे यंत्र नष्ट झाले.

४. सूर्यतेजाच्या अभावी समष्टीत काळे तंतू वाढत असल्याचे लक्षात येताच ऋषींनी आवरण नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि ७० टक्के आवरण नष्ट केले.

१९५१-१९५५

१. मोठ्या वाईट शक्तींनी भारताची सत्ता पत्करल्यामुळे पूर्ण भारतावर मोठ्या वाईट शक्तींचे राज्य निर्माण झाले, तसेच सततच्या सूक्ष्म युद्धामुळे ऋषींची शक्ती न्यून झाली, तरी ऋषींनी हिमालयात अखंड यज्ञ चालू केले. त्यामुळे सतत प्रक्षेपित होत असलेल्या त्रासदायक शक्तीला २० ते ३० टक्के आळा घालणे ऋषींना सहजरित्या शक्य झाले.

२. ऋषींची शक्ती अल्प झाल्यामुळे पूर्ण विश्वावर वाढत असलेला मोठ्या वाईट शक्तींचा ताबा कमी करणे अशक्य झाले, तरी त्यांनी सूक्ष्मयुद्ध करून प्रत्येक देशाला मोठ्या वाईट शक्तींच्या ताब्यातून १० ते ३० टक्के मुक्त ठेवले.

३. मोठ्या वाईट शक्तींचा प्रभाव कमी व्हावा म्हणून श्रीविष्णूच्या इच्छाशक्तीच्या आधारे ऋषींनी आपल्या आत्मशक्तीच्या आधारे आपल्या बळाला क्रियात्मक क्रियाशक्तीच्या स्वरूपात रूपांतरित केले आणि या प्रक्रियेद्वारे विभिन्न शस्त्रांची निर्मिती करून मोठ्या वाईट शक्तींवर आक्रमण केले. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींची मोठ्या प्रमाणावर शक्ती अल्प होऊन मोठ्या वाईट शक्तींची नष्ट होण्याची वेळ आली. त्याच वेळी प्रमुख मोठ्या वाईट शक्तींनी जागृत झालेल्या कलीबिजाला आवाहन करून युद्धस्थळी बोलावले आणि मोठ्या वाईट शक्तींच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. कलीने भ्रमात्मक विश्वाची रचना करून ऋषींना गोंधळात टाकल्याने त्यांची शक्ती आवरण नष्ट करण्यासाठी खर्च झाली. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींचे बळ वाढले आणि त्यांनी ऋषींना हरवले. मोठ्या वाईट शक्तींनी ऋषींवर मिळवलेला हा पहिला विजय होता.

१९५६-१९६०

१. ऋषींचा पराजय झाल्यावर त्यांची शक्ती खूप अल्प झाल्यामुळे त्यांनी यज्ञाच्या माध्यमातून मोठ्या वाईट शक्तींशी लढा देणे चालू ठेवले.

२. ऋषींनी यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या शक्तीचे श्रीविष्णूच्या क्रियाशक्तीच्या आधारे दोहन करून चैतन्याच्या थंडगार लहरींचे पूर्ण विश्वात प्रक्षेपण चालू ठेवले. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना लोकांच्या इच्छाशक्तीवर ताबा ठेवणे किंवा त्यांची प्राणशक्ती घेणे खूप कठीण झाले.

३. ऋषींनी यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचे ब्रह्मांड आणि ब्रह्मांडापर्यंत असलेल्या विविध मार्गांवरून प्रक्षेपण करून पूर्ण पृथ्वीवर ऊर्ध्व दिशेकडून प्रक्षेपण केले. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींचा ऊर्ध्व दिशेकडे असलेला त्रासदायक (काळ्या) शक्तीचा प्रवाह कृष्णविवराकडे जाऊ लागला.

१९६१-१९६५

१. ऋषींनी यज्ञाच्या माध्यमातून वायूत पसरत असलेल्या मोठ्या वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या काळ्या तंतूंना नष्ट केले. तसेच काळ्या तंतूंचे प्रक्षेपण हिमालयाकडे व्हावे; म्हणून हिमालयाच्या वरच्या पोकळीच्या अग्रभागात आकर्षणचक्राची निर्मिती श्रीविष्णूच्या सुदर्शनचक्राच्या उपरूपाद्वारे केली. तसेच मंत्रांचे योग्य उच्चारण करून काळ्या तंतूंनी हिमालयापर्यंत येण्यासाठी विविध मार्गांची निर्मिती केली.

२. ऋषींनी जागृत सूर्याची मारकता वाढावी; म्हणून त्याला आहुती देणे चालू केले. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींनी ५ वेळा प्रयत्न करूनही सूर्याचे तेज १० टक्के एवढ्या अल्प प्रमाणातच येणे न्यून झाले.

३. ऋषींचे भूमातेकडे दुर्लक्ष होताच मोठ्या वाईट शक्तींनी भूमातेच्या उत्पादनक्षमतेवर प्रहार केला आणि तिला प्रचंड प्रमाणात न्यून केले. त्या वेळी ऋषींनी जागृत आत्मशक्तीच्या बळावर पृथ्वीची उत्पादनक्षमता वाढवली. तसेच पृथ्वीच्या गर्भात तेजकणांची स्थापना केली. त्यामुळे पृथ्वीची उत्पादनक्षमता वाढली.

४. ऋषींद्वारे केल्या जाणार्‍या यज्ञामुळे वायूच्या वरच्या पट्ट्यात असलेल्या सत्त्वकणांचे प्रमाण स्थिर राहिले.

१९६६-१९७०

१. मोठी वाईट शक्ती, कली आणि बळीराजा यांच्या आक्रमणांचा प्रतिकार करता यावा; म्हणून ऋषींनी श्रीविष्णूचा धावा करून त्याच्याकडून शक्ती घेऊन मोठ्या वाईट शक्तींचा यशस्वीरित्या प्रतिकार करून पंचतत्त्वावर ताबा घेण्याचा कट मोडला. या युद्धात दोन्ही पक्षांच्या शक्तीचा र्‍हास मोठ्या प्रमाणावर झाला, तसेच युद्धात ऋषींचा विजय निश्चित आहे, हे कळल्यावर कलीने मायिक आवरणाची उत्पत्ती करून ऋषींना गोंधळात टाकून बळीराजासह युद्धभूमीवरून पलायन केले.

२. मोठ्या वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या जडत्वदर्शक अधोगामी चिकट साठ जडत्वदर्शक अधोगामी चिकट साठ्यांची अन्न दूषित करण्याची क्षमता ऋषींनी पंचज्ञ यज्ञ करून ७०-९० टक्के अल्प केली.

३. कलीने बळीराजाच्या साहाय्याने आपतत्त्वाशी निगडित लहरींना भारित करणे सुरू केले. त्यामुळे भूरेषेवर (भूमार्गावर) असलेले आपतत्त्वाचे प्रमाण डळमळीत झाले. अनेक ऋषींनी आपल्या आत्मशक्तीच्या एकत्रित आपात्मक लहरी प्रक्षेपण करून ९० टक्के विष शिवाकडे वळवले.

४. मोठ्या वाईट शक्तींनी वायूत सोडलेले विषारी गोळे ऋषींनी मार्गातच नष्ट केले. त्यामुळे वायू दूषित झाला; पण विषारी गोळ्यांच्या त्रासापासून जिवाला वाचवणे ऋषींना शक्य झाले.

१९७१-१९७५

१. ऋषींनी आपली साधना वाढवून ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांकडून विविध प्रकारच्या शक्ती ग्रहण केल्या. तसेच हिमालयाच्या चारही बाजूंना सोनेरी कवच निर्माण केले.

२. अनेक ऋषींनी श्रीविष्णु आणि ब्रह्मदेव यांच्याकडून उच्च क्रांतीसाठी आवश्यक शक्ती घेतली.

३. आकाशावर ताबा घेण्यासाठी आलेल्या मोठ्या वाईट शक्तींचा असंघटितपणाचा लाभ घेऊन ऋषींनी त्यांच्याशी मार्गातच सूक्ष्मयुद्ध करून एका मोठ्या वाईट शक्तीला सोडून इतर सर्व मोठ्या वाईट शक्तींना हाकलले.

४. अन्य घटकांवर ताबा घेण्यासाठी आलेल्या मोठ्या वाईट शक्तींनी ऋषींच्या शक्तीचा धसका घेतला. त्यामुळे या काळात त्यांना १० टक्यांहून अधिक दाब वाढवता आला नाही.

५. मोठ्या वाईट शक्तींवर विजय प्राप्त झाल्याने, तसेच मोठ्या वाईट शक्तींना अत्यल्प प्रमाणात त्यांच्या कार्यात यश मिळाल्यामुळे ऋषींचे काही काळासाठी मोठ्या वाईट शक्तींकडे दुर्लक्ष झाले. याच काळात मोठ्या वाईट शक्तींनी एकत्रित होऊन मूळ बिंदूरेषेवर (बिंदूमार्गावर) आक्रमण केले. या हल्ल्याला परतवण्यासाठी ऋषींना मोठ्या वाईट शक्तींच्या तुलनेत अधिक प्रमाणात शक्ती खर्च करावी लागली.

६. मूळ मार्गावरच मोठ्या वाईट शक्तींनी आक्रमण केल्यामुळे ऋषींची शक्ती न्यून झाली आणि मोठ्या वाईट शक्तींची शक्ती वाढली. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना विरोध करणे ऋषींना खूप जड झाले.

७. मोठी वाईट शक्ती आणि ऋषी यांचे सूक्ष्मयुद्ध खूप काळ चालले. या युद्धात दोन्ही बाजूंची शक्ती जवळ-जवळ सारखीच असल्यामुळे कोणत्याही पक्षाला युद्ध कोण जिंकणार, हे ठरवणे अशक्य झाले. युद्धाच्या शेवटच्या क्षणी मोठ्या वाईट शक्तींनी कलीला बोलावले. कलीमुळे ऋषींची शक्ती न्यून होऊ लागली. त्या वेळी ऋषींनी श्रीकृष्णाचे स्मरण केले. श्रीकृष्ण युद्धभूमीवर प्रकट होताच कलीने युद्धभूमीवरून पलायन केले. कली जाताच श्रीकृष्णाने अनेक मोठ्या वाईट शक्तींना नष्ट करून युद्धात ऋषींना विजय मिळवून दिला. भारताचा त्या वेळचा आपत्काळ मोठ्या वाईट शक्तींनी ठरवलेल्या काळापेक्षा खूप लवकर संपला.

१९७६-१९८०

१. युद्धात ऋषींची शक्ती खूप अल्प झाल्यामुळे ऋषी अधिक काळ तप करून शक्तीचा संचय करू लागले.

२. मोठ्या वाईट शक्तींनी पंचतत्त्व आणि पंचकरेषा (पंचकमार्ग) (टीप) यांच्यावर आक्रमण केल्यामुळे या मार्गांचे संतुलन बिघडले आणि त्यामुळे पृथ्वीवर भीषण संकट येण्याचे प्रमाण वाढले. तप करत असलेले ऋषी आपले तप सोडून मार्गाच्या दोलायमान स्थितीला स्थिर करण्यासाठी प्रयत्न करू लागले.

टीप : श्रीविष्णूचे स्मरण करून ऋषींनी ब्रह्मांडाची स्थितीरेषा (स्थितीमार्ग) ब्रह्मांडाच्या स्थितीरेषेवरून (स्थितीमार्गावरून) सरकलेल्या मार्गाला आत्मबळाने उचलले. त्या वेळी तिला अधिक काळपर्यंत उचलून ठेवणे अशक्य झाल्यावर त्यांनी श्रीविष्णूच्या कश्यप अवताराचे स्मरण केले. त्या वेळी निर्गुण अवस्थेतून साकार अवस्थेत येऊन कश्यपतत्त्वाने ब्रह्मांडाची स्थितीरेषा (स्थितीमार्ग) ब्रह्मांडाच्या स्थितीरेषेच्या (स्थितीमार्गाच्या) खाली तिच्या स्थानाची निर्मिती करून मार्गाला दोलायमान होण्यापासून वाचवले. या प्रक्रियेत क्षीण झालेली ऋषींची शक्ती पूर्णपणे समाप्त झाली. – एक विद्वान

३. ऋषींची शक्ती न्यून झाल्याचा लाभ घेऊन मोठ्या वाईट शक्तींनी हिमालयाकडून ऋषींच्या तपाच्या फलस्वरूप प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्याच्या कारंज्याच्या रूपात लहरींना ब्रह्मांडरेषेवरून (ब्रह्मांडमार्गावरून) ब्रह्मांडाच्या अभ्युदय पोकळीत पाठवण्याचा प्रयत्न केला; पण ऋषींच्या आत्मशक्तीमुळे या पंचकरेषांचे (पंचकमार्गाचे) प्रक्षेपण भारतात होऊ लागले.

१९८१-१९८५

१. ऋषींकडे खूप अल्प प्रमाणात शक्ती असूनही त्यांनी मोठ्या वाईट शक्तींना विरोध करणे सतत चालू ठेवले. हे या काळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

२. पाकिस्तानकडून येत असलेल्या प्रहारमयी नादरूप आघातात्मक शक्तीलहरींच्या वेगाला थांबवणे अशक्य असतांना ऋषींनी भारताच्या प्रवेशद्वारात (हिमालयाचा वरचा पट्टा जेथून लहरी प्रवेश करतात.) श्रीविष्णूकडून घेतलेल्या निर्दलनात्मक कृपाशक्तीचे लहरींच्या स्वरूपात आत्मशक्तीने रूपांतर करून या लहरींना आत्मसंकल्पाने फिरवण्यास प्रारंभ केला. त्यामुळे ५० टक्के पर्यक्षकलहरी चक्राच्या खालच्या टोकात येऊन कृष्णविवराकडे
जाणार्‍या मार्गावरून प्रवास करून कृष्णविवरात समाविष्ट झाल्या. या लहरी पूर्णपणे कार्यरत झाल्या असत्या, तर पूर्ण पृथ्वीवर असलेले स्थिरांकुर बीज नष्ट झाले असते.

३. ‘मोठ्या वाईट शक्तींचे सत्त्वकवचाला नष्ट करायचे नियोजन आहे’, हे लक्षात येताच ऋषींनी आपल्या एकत्रित समष्टी आत्मसंकल्पाने सत्त्वकवचावर त्यांनी केलेल्या समष्टी साधनेमुळे निर्माण झालेल्या ऋषीतेजाने भारित लहरींचे आवरण आणले. त्यामुळे यशोराज्ञी (ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मांडात कार्यरत असणारी इच्छाशक्ती) शक्तीच्या उच्च प्रदीर्घ घणात्मक नादावर, सुप्त धर्धणात्मक (सूक्ष्मनादाचा विस्फोट होतांना येणारा नाद) नादावर मोठ्या वाईट शक्तींनी अग्रध (सरळ ऐवजी वक्र) प्रक्षेपण कल्कीकडून घेण्यास यश प्राप्त केले, तरी ऋषीचर्भ ऋषींनी केलेल्या समष्टी साधनेमुळे निर्माण झालेल्या ऋषीतेजाने भारित लहरींच्या आवरणामुळे मोठ्या वाईट शक्तींना सत्त्वकवचावर फक्त कंपनच करता आले.

४. पंचकरेषेचे (पंचकमार्गाचे) प्रमाण बिघडले, तरी ऋषींकडे शक्ती नसल्यामुळे ते काहीच करू शकले नाहीत.

१९८६-१९९०

१. ऋषींनी साधना वाढवून शक्ती प्राप्त करण्यास प्राधान्य दिले आणि श्रीविष्णूच्या इच्छेप्रमाणे साधनारत असतांना त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वामुळे कार्य होऊ लागले.

२. मोठ्या वाईट शक्तींनी सोडलेल्या काळ्या तंतूंचे साधनारत असलेल्या ऋषींद्वारे नैसर्गिक अवस्थेत विघटन केले गेले. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना बिंदूला गतीमान करणे शक्य झाले; मात्र बिंदूला त्याच्या केंद्रस्थानातून हालवणे शक्य झाले नाही.

३. ऋषींना श्रीविष्णूने साधनेत रत रहाण्याची आज्ञा दिल्यामुळे शक्ती असतांनाही ऋषींनी या घटनेकडे साक्षीभावाने पाहिले. तेव्हा वेळ पडल्यावर श्रीविष्णूच्या संकल्पामुळे ऋषींकडून साधक आणि भक्त यांच्या रक्षणासाठी आपोआप शक्तीचे प्रक्षेपण होत होते.

४. ऋषींची साधना आवश्यक तेवढ्या मात्रेत पूर्ण झाल्यावर ऋषींना परत सृष्टीचे रक्षण करण्याचे कार्य श्रीविष्णूने दिले. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना गणकयंत्र भूकक्षेच्या आत न आणता ब्रह्मांड-रेषेच्या (ब्रह्मांडमार्गाच्या) वरच्या भागी आणून दाब वाढवणे शक्य झाले.

१९९१-१९९५

१. मोठ्या वाईट शक्तींची शक्ती तुल्यबळ काळाच्या साहाय्याने वाढल्यामुळे तिला विरोध करणे ऋषींना कठीण होऊ लागले.

२. मोठ्या वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या चक्राकार मायावी लहरींच्या ओघाला ऋषींनी आपल्या धनुष्य शक्तीच्या साहाय्याने थांबवले. त्यामुळे मानवावर या लहरींचा अधिक प्रभाव न होता आध्यात्मिक पर्यावरणावर होऊन आध्यात्मिक पर्यावरणातील व्याप्त चैतन्य अल्प झाले.

३. मोठ्या वाईट शक्तींचे कोटी-कोटी लोकांचा बळी घेण्याचे नियोजन ऋषींनी हजारपर्यंत आणून कोटी लोकांचे प्राण वाचवले.

४. कालचक्राच्या विरुद्ध दिशेस जाऊन ऋषींद्वारे श्रीविष्णूच्या आज्ञेने मोठ्या वाईट शक्तींना विरोध केला. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना तेजोमय ऊर्जारूप क्रियाशक्ती लहरींचे प्रक्षेपण करून पंचकरेषेला (पंचकमार्गाला) नष्ट करणे शक्य झाले नाही.

५. ऋषींनी सूक्ष्म हिमालयातून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्याचे प्रमाण वाढवले. त्यामुळे अनेक साधक आणि भक्त यांची घरे हिमालयाप्रमाणे चैतन्यमय झाली अन् तेजकणांनी भरून गेली.

१९९६-२०००

१. पंचकरेषेला (पंचकमार्गाला) तडा देऊन मोठ्या वाईट शक्तींनी अनेक लोकांचा प्राण घेण्याचे नियोजन केले होते; पण ऋषींच्या उष्ण तेजोमय लहरींच्या प्रक्षेपणामुळे मोठ्या वाईट शक्तींना त्यांचे नियोजन फक्त ३० टक्के साध्य करता आले.

२. ऋषींनी हिमालयातून प्रक्षेपित होणारे चैतन्याने भारित सूक्ष्म कणांचे कवच तडा गेलेल्या पंचकरेषांना (पंचकमार्गांना) दिल्यामुळे मोठ्या वाईट शक्तींद्वारे अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना पंचकरेषा (पंचकमार्ग) तोडणे शक्य झाले नाही.

३. प.पू. डॉक्टर यांच्यासारख्या धर्मगुरूंचे कार्य समष्टी सुप्त अवस्थेतून समष्टी प्रकट अवस्थेत आल्यामुळे आध्यात्मिक पर्यावरणाचा तोल बिघडवण्याचे मोठ्या वाईट शक्तींचे ३० टक्के प्रयत्न निष्फळ झाले.

४. प.पू. डॉक्टर आणि ऋषी यांच्यामुळे पुढे मोठ्या वाईट शक्तींना विरोध करणे खूप कठीण होऊ लागले. मोठ्या वाईट शक्तींना वरच्या मार्गाला काही करणे अशक्य झाल्यामुळे मोठ्या वाईट शक्तींनी लहान मार्गांद्वारे निसर्गाला तडा देण्याचा प्रयत्न केला.

२०००-२००५ : मोठ्या वाईट शक्तींचे या प्रकारचे नियोजन आहे, हे ऋषींनी त्यांच्या सूक्ष्म-चक्षूंनी बघितले होते. त्यामुळे त्यांनी पंचतत्त्वांना अधिक इजा होऊ नये, या हेतूने क्रियाशक्तीरूपी संचारणात्मक स्थिती, म्हणजे क्रियाशक्तीरूपी संचारणात्मक स्थितीलहरींचे आवरण आध्यात्मिक पर्यावरणाला दिले. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना कोणत्याही पंचतत्त्वावर ३० टक्क्यांहून अधिक प्रमाणात आवरण आणणे शक्य झाले नाही.

– धर्मतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.५.२००६, सकाळी ९.२३)

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
ज्ञानातील न कळणार्‍या शब्दांचा अर्थ विचारल्यावर
मोठ्या वाईट शक्तींनी ते शब्द चुकीचे असल्यासे सांगून त्यांना पर्यायी शब्द देणे

हे ज्ञान देतांना मोठ्या वाईट शक्तींनी काही नवीन शब्द वापरले. या शब्दांचा अर्थ ‘एक ज्ञानी’ मोठ्या वाईट शक्तींना विचारल्यावर ‘असे शब्द नाहीत’, असे सांगून त्यांनी त्या शब्दांना पर्यायी योग्य शब्द दिले. वरील ज्ञानामध्ये हे सुधारित शब्द अंतर्भूत केले आहेत. वाचकांच्या माहितीसाठी येथे चुकीचे शब्द आणि त्याला पर्यायी योग्य शब्द देत आहोत. यावरून वाचकांना कल्पना येऊ शकेल की, मोठी वाईट शक्ती ज्ञानामध्ये कठीण; पण अर्थहीन शब्द वापरून कसे फसवतात.

१. संकलक : ‘क्रभंक’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘क्रियाशक्ती रूपी संचारणात्मक स्थिती’ असा शब्दप्रयोग करावा.

२. संकलक : ‘भयाव्रक ’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. या ऐवजी ‘जडत्वदर्शक बद्धात्मक सिद्धी’ असा शब्दप्रयोग करावा. या सिद्धीच्या माध्यमातून मोठ्या वाईट शक्तींना पृथ्वीतत्त्वावर काळ्या तंतूचे प्रक्षेपण करून पृथ्वीमध्ये असलेली उत्पादनक्षमता कमी करणे शक्य होते.

३. संकलक : ‘चक्षवक्र’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. या ऐवजी ‘तेजोमय ऊर्जा सिद्धी’ असा शब्दप्रयोग करावा. या सिद्धीच्या माध्यमातून मोठ्या वाईट शक्तींना तेजतत्त्वाच्या दर्शक असलेल्या घटकांवर काळ्या लहरींचे प्रक्षेपण करून वातावरणातील उष्णता वाढवून वायूमंडलात तमकणांचे प्राबल्य वाढवणे शक्य होते.

४. संकलक : ‘प्रंजय’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘वायूमंडलात संचारणारी प्राणऊर्जा’ असा शब्दप्रयोग करावा.

५. संकलक : ‘ऋघात्मक’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘ऋषींच्या ध्यानातून निर्माण होणारे तेज’ असा शब्दप्रयोग करावा.

६. संकलक : ‘उभ्रयश’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘जडत्वदर्शक अधोगामी चिकट साठे’ असा शब्दप्रयोग करावा.

७. संकलक : ‘वभ्रक’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘ब्रह्मांडाची स्थिती रेषा’ असा शब्दप्रयोग करावा.

८. संकलक : ‘दर्धीय’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘आकुंचनात्मक स्वरूपात’ असा शब्दप्रयोग करावा.

९. संकलक : ‘पर्यक्षक’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘प्रहारमयी नादरूप आघातात्मक शक्ती’ असा शब्दप्रयोग करावा.

१०. संकलक : ‘व्याभीष’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘श्रीविष्णूच्या निर्दलनात्मक कृपाशक्ती’ असा शब्दप्रयोग करावा.

११. संकलक : ‘ऋषीचर्भ’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘ऋषींनी केलेल्या समष्टी साधनामुळे निर्माण झालेल्या ऋषीतेजाने भारित लहरींचे आवरण’ असा शब्द प्रयोग करावे.

१२. संकलक : ‘चश्रत’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘चक्राकार मायावी लहरी’ असा शब्दप्रयोग करावा.

१३. संकलक : ‘दर्भक’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. याऐवजी ‘तेजोमय ऊर्जारूप क्रियाशक्ती’ असा शब्दप्रयोग करावा.

१४. संकलक : ‘उर्म तेजात्मक’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. या ऐवजी ‘उष्ण तेजोमय’ असा शब्द प्रयोग करावे.

१५. संकलक : ‘दर्धाथ’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : असा शब्द नाही. या ऐवजी ‘चैतन्याने भारित सूक्ष्म कण’ असा शब्द प्रयोग करावे. – (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.१.२००७, सायंकाळी ६.४४)

लेख क्रमांक ९ वाचण्यासाठी भेट द्या. सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना होणारे विविध प्रकारचे त्रास आणि त्यांना मिळणार्‍या ज्ञानाची वैशिष्ट्ये !

2 thoughts on “आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी आणि त्याच्या रक्षणासाठी ऋषींनी केलेले प्रयत्न”

  1. हा लेख वाचून ऋषींप्रति कृतज्ञता वाटली. पुढील काळात काय घडले व सध्या काय घडत आहे हे जाणून घ्यायला खूप आवडेल.

    Reply
    • नमस्कार सागर जी

      आपण बरोबर सांगितले. ऋषी-मुनींनी समस्त जीवांसाठी अनेक कष्ट घेतले आणि आपले रक्षण केले. ते द्रष्टे होते, त्यांना पुढे येणाऱ्या काळात काय होणार आहे हे माहिती होते. त्यामुळे त्यांनी सर्वांना देवाला शरण जाण्यासाठी विविध अध्यात्मिक मार्ग दिले आहेत. काय घडले किंवा काय घडणार याचा विचार न करता, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर साधना केली तर निश्चितच देव आपले रक्षण करेल. ऋषी-मुनींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अध्यात्म म्हणजेच साधना कृतीत आणणे होय.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply

Leave a Comment