विज्ञानाच्या निकषांवर गोदुग्ध आणि गोघृत (गायीचे तूप) यांचे महत्त्व !

Article also available in :

गायीचे तूप

१. अनेक आयुर्वेदाचार्यांनी गोमातेच्या पंचगव्याचा
अनेक प्रकारच्या रोगांच्या उपचारांसाठी उपयोग करणे

‘गोमाता प्रदान करत असलेले पंचगव्य – दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांचा अनेक प्रकारच्या रोगांच्या उपचारांसाठी उपयोग केला जातो. महर्षि चरक, सुश्रुत, धन्वन्तरि, वाग्भट आणि अन्य अनेक आयुर्वेदाचार्यांनी लिहिलेल्या चिकित्साशास्त्राच्या ग्रंथांमध्ये पुरातन काळाच्या रोगोपचारासंबंधी पंचगव्याचा उपयोग करत असल्याचे वाचायला मिळते.

 

२. गोमातेचे दूध अमृतासमान गुणकारी, पचायला
अत्यंत हलके आणि तिच्या दुधातील स्निग्धता आरोग्याला पूरक असणे

गोमातेचे दूध अमृतासमान गुणकारी आणि पचायला अत्यंत हलके असते. गायीच्या दुधामध्ये ३.५ ते ४ टक्के, तर म्हशीच्या दुधामध्ये ५.५ ते ६ टक्के स्निग्धता असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (W.H.O.) म्हणण्यानुसार मानवी शरिराला हितकारक ४.५ ते ५ टक्के एवढी स्निग्धता पुरेशी आहे. यापेक्षा अधिक स्निग्धता मानवासाठी हानीकारक आहे.

 

३. म्हशीच्या दुधामध्ये स्निग्धतेचे प्रमाण
अधिक असल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढून हृदयाला हानीकारक असणे

म्हशीच्या दुधामध्ये स्निग्धतेचे प्रमाण अधिक असते. ती व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. म्हशीच्या दुधात कोलेस्टेरॉल असते, ते हृदयविकाराचा झटका (हार्टॲटॅक) येण्यास कारणीभूत होते. हृदयविकार होण्याच्या भीतीने देशी तूप, ज्यामध्ये लोकांनी गायीचे तूपही ग्रहण करणे बंद केले आणि वनस्पती तूप (डालडा) इत्यादीचा उपयोग करू लागले; परंतु यामध्ये आढळणारी स्निग्धता ‘ट्रान्स स्निग्धता’ असते, जी अधिक हानीकारक आहे. ट्रान्स स्निग्धता ४२ डिग्री तापमानावर वितळते, तर आमचे शरीर ३६ डिग्री तापमानापर्यंत वितळणार्‍या वस्तूच पचवू शकते. त्यामुळे जी ट्रान्स स्निग्धता असते, ती शरिरात पचनाविना पडून रहाते आणि कोलेस्टेरॉलही वाढवते.

 

४. गोमातेच्या दुधातून सुवर्ण धातूची पूर्तता होणे
आणि गायीचे दूध अन् तूप हृदयाच्या कमकुवतपणावर संरक्षककवच असणे

गोमातेच्या दुधात सुवर्णरंगाचे ‘कॅरोटिन’ तत्त्व (पदार्थ) असते, जे शरिरात सुवर्ण धातूची पूर्तता करते. गोदुग्धाचा पिवळेपणा किंवा सुवर्णासारखा रंग त्यात असलेल्या सुवर्णतत्त्वाचेच दर्शक आहे. सुवर्ण हृदयरोगाच्या निदानासाठी अत्यावश्यक तत्त्व आहे. गोमातेचे दूध आणि गोमातेचे तूप हृदयावरील तक्रारींसाठी किंवा हृदयाच्या कमकुवतपणावर संरक्षककवच आहे.

 

५. यज्ञात गायीच्या १० ग्रॅम तुपाची आहुती दिल्यामुळे १ टनपेक्षाही
अधिक प्राणवायू (ऑक्सिजन) उत्पन्न होत असल्याचे वैज्ञानिकांनी मान्य करणे

वैज्ञानिकांची मान्यता आहे की, गायीच्या १० ग्रॅम तुपाची यज्ञात आहुती दिल्यामुळे जवळजवळ १ टनपेक्षाही अधिक प्राणवायू (ऑक्सिजन) निर्माण होतो. त्यामुळे आमच्या पूर्वजांनी यज्ञ-हवन करण्याला महत्त्व दिले आणि सामाजिक अन् धार्मिक कार्यांमध्ये यज्ञयाग करणे अनिवार्य केले. देवतांच्या पूजेमध्ये केवळ गोमातेचे दूध आणि तूप यांचाच उपयोग करतात, अन्य कोणत्याही प्राण्याचे दूध-तूप उपयोगात आणले जात नाही.

 

६. गोमातेच्या तुपात कर्करोगाशी (कॅन्सरशी) लढण्याचे गुण
असतात. अन्य कोणत्याही प्राण्याच्या तुपामध्ये ही क्षमता नाही.

७. गायीचे ताक मनुष्यासाठी अमृतासमान हितकारी-गुणकारी असणे

गोमातेचे दही आणि ताक पोटासाठी अमृत आहे. गायीच्या दुधापासून बनवलेले ताक वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांचे शमन करणारे, भूक वाढवणारे, कफनाशक अन् मूळव्याध यांना मुळापासून नष्ट करणारे आहे. ताक आपल्या आंबटपणामुळे वाताचे, माधुर्याने पित्ताचे आणि चिकटपणामुळे कफाचे शमन करते. याला ‘त्रिदोषनाशक’ मानले गेले आहे. ताक मनुष्यासाठी हितकारी-गुणकारी अमृतासमान आहे.

 

८. गोसेवेचे माहात्म्य !

हे सर्व लाभ लक्षात घेता आपण जर एका गोमातेला सांभाळू शकत असाल, तर आपल्या घरात ती अवश्य पाळावी. गोमातेच्या सेवेमुळे सर्व पुण्य अर्जित करावे. गोसेवेच्या माहात्म्याची चर्चा करतांना म्हटले गेले आहे,…

तीर्थस्नानेषु यत्पुण्यं यत्पुण्यं विप्रभोजने ।
सर्वव्रतोपवासेषु सर्वेष्वेव तपःसु च ।।

यत्पुण्यं च महादाने यत्पुण्यं हरिसेवने ।
भुवः पर्यटने यत्तु वेदवाक्येषु यद्भवेत् ।।

यत्पुण्यं सर्वयज्ञेषु दीक्षया च लभेन्नरः ।
तत्पुण्यं लभते सद्यो गोभ्यो दत्त्वा तृणानि च ।।

– ब्रह्मवैवर्तपुराण, खण्ड ४, अध्याय २१, श्लोक ८८ ते ९०

अर्थ : जे पुण्य तीर्थस्नानामध्ये आहे, जे पुण्य ब्राह्मणभोजन देण्यामध्ये आहे, जे पुण्य व्रते, उपवास आणि तपस्या यांद्वारे प्राप्त होते, जे पुण्य श्रेष्ठ दान देण्यात आहे आणि जे पुण्य श्रीहरिच्या अर्चनेमध्ये आहे, पृथ्वी प्रदक्षिणेने वेदवाक्यांचे पठण केल्याने जे पुण्य मिळते, तसेच यज्ञाची दीक्षा घेतल्याने जे पुण्य प्राप्त होते; ते पुण्य तर केवळ गोमातेला चारा देण्यामुळे त्वरित प्राप्त होते.’

(साभार : मासिक ‘कल्याण’)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment