
चेन्नई (तमिळनाडू) – गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथील ‘महाराष्ट्र मंडळ, कोईम्बतूर’ येथे मराठी बांधवांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘गणेशोत्सवातील अध्यात्मशास्त्र आणि आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयांवर प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन सनातन संस्थेच्या साधिका सौ. रश्मी चिमलगी यांनी घेतले. याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. यातील काही जिज्ञासूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
या वेळी सौ. रश्मी चिमलगी यांनी श्री गणेशचतुर्थी साजरी करण्यामागील महत्त्व आणि गणेशपूजेत वापरण्यात येणार्या दूर्वा अन् लाल फूल यांचे महत्त्व, याविषयीची माहिती सांगितली.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !