सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या राष्ट्र-धर्म कार्यास साहाय्य करणे आमचे कर्तव्य ! – चारुदत्त जोशी, संपादक, ‘बी न्यूज’

श्री. चारुदत्त जोशी (उजवीकडे) यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देतांना डॉ. मानसिंग शिंदे आणि श्री. किरण दुसे

कोल्हापूर – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या धर्मजागृती अन् राष्ट्रजागृती यांचे मोठे कार्य करत आहे. या कार्यास साहाय्य करणे आमचे कर्तव्य आहे. गतवेळेस सांगितलेला कुलदेवतेचा नामजप मी करत आहे. यातून मला समाधानही मिळत आहे, असे प्रतिपादन येथील ‘बी न्यूज’चे संपादक श्री. चारुदत्त जोशी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी चारुदत्त जोशी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट दिली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिदिन ऑनलाईन विशेष धर्मसत्संगांचे प्रक्षेपण करण्यात येते. हे सत्संग २० एप्रिलपासून कोल्हापूर येथील स्थानिक ‘बी’ न्यूजच्या ‘भक्ती’ वाहिनीवरील चॅनल क्रमांक ५३१ वर प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित करण्यात येत आहेत. गेल्या ९ मासांपेक्षा अधिक काळ या सत्संगाचे प्रक्षेपण करून लाखो जिज्ञासूंपर्यंत राष्ट्र, धर्म, अध्यात्म, भावजागृती, भारताचा गौरवशाली इतिहास, बालसंस्कार, आयुर्वेद, ज्योतिष, वास्तूशास्त्र यांसह अनेकविध विषयांच्या संदर्भातील माहिती घरबसल्या पहाण्यासाठी उपलब्ध होत आहे. याचसमवेत सनातन संस्थेच्या वतीने गुढीपाडवा, गणेशोत्सव, दत्तजयंत्ती यांसह प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेल्या विशेष सत्संगाचे प्रक्षेपणही ‘बी’ न्यूजवर करण्यात येते. तरी धर्मकार्यातील एक सहभाग म्हणून सनातन संस्थेच्या वतीने श्री. चारुदत्त जोशी यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देण्यात आली.

या वेळी श्री. किरण दुसे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता होणार्‍या ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेची माहिती दिल्यावर त्याविषयी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत श्री. जोशी यांनी ‘या सभेची पूर्वप्रसिद्धी आणि उत्तरप्रसिद्धी दोन्ही करू’, असे सांगितले.

समाजपर्यंत ‘बिंदूदाबन’ या विषयाची माहिती पोचण्यासाठी ‘वाद-संवाद’ या अंतर्गत एका विशेष कार्यक्रर्माचे आयोजन करून त्यात सनातन संस्थेच्या साधकास विषय मांडण्यासाठी श्री. चारुदत्त जोशी यांनी निमंत्रित केले आहे.

Leave a Comment