श्राद्ध विधीकडे हिंदूंनी सकारात्मक आणि अध्यात्मशास्त्रीय दृष्टीने पहाणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘पितृपक्ष श्राद्ध महिमा शास्त्र आणि शंकानिरसन’ या विषयावर ऑनलाईन कार्यक्रम जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून धर्मशिक्षण देणारी सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

सनातन संस्थेच्या वतीने ‘पितृपक्ष श्राद्ध महिमा – शास्त्र आणि शंकानिरसन’ या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘पूर्वजांचे त्रास कसे ओळखावेत ?’, ‘श्राद्धविधी करण्याचे महत्त्व’, ‘श्राद्धविधी केल्याने होणारे लाभ’, ‘भरणी श्राद्धाचे महत्त्व’, ‘श्राद्ध कुणी करावे ?’ आणि ‘कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर पितृपक्षात शास्त्रोक्त महालय श्राद्धविधी करणे शक्य नसल्यास काय करावे ?’ या विविध प्रश्‍नांची उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment