कोरोना आजारावर योग आणि ध्यानधारणा या प्राचीन भारतीय उपचारपद्धती परिणामकारक ! – आंतरराष्ट्रीय तज्ञांचा दावा

सहस्रो वर्षांपूर्वी भारतीय ऋषिमुनींना ठाऊक होते, त्या भारतीय योग आणि ध्यानधारण यांचे महत्त्व विदेशांतील तज्ञांना आता कुठे कळायला लागले आहे. यातून ते किती मागास आहेत आणि हिंदु संस्कृती किती प्रगत आहे, हे लक्षात येते ! मात्र पिकते तेथे विकत नाही आणि पाश्‍चात्यांच्या अंधानुकरणामुळे आतापर्यंत याची तथाकथित पुरो(अधो)गाम्यांनी खिल्ली उडवली, हे आता भारतियांच्या लक्षात येईल !

नवी देहली – कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी योग आणि ध्यानधारणा या २ प्राचीन उपचारपद्धती परिणामकारक असल्याचा शोध काही आंतरराष्ट्रीय तज्ञांनी लावला आहे. अमेरिकेतील ‘मेसाच्युसेट्स इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी’, ‘कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी’, ‘चोपडा लायब्ररी’ आणि ‘हावर्ड युनिव्हर्सिटी’ यांच्या संशोधकांनी ‘जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह अँड कॉम्प्लिमेंट्री मेडिसीन’मध्ये (‘जे.ए.सी.एम्.’मध्ये) प्रसिद्ध केलेल्या लेखात ‘योग अन् ध्यानधारणा’ यांची उपयुक्तता विषद केली आहे. हे दोन्ही कोरोनाविरुद्ध लढण्यामध्ये साहाय्यक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

जे.ए.सी.एम्. मधील लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

https://www.liebertpub.com/doi/10.1089/acm.2020.0177 

‘जे.ए.सी.एम्’.चे प्रमुख संपादक जॉन विक्स यांनी ‘कोरोनासारख्या जागतिक साथीविरोधात अधिकाधिक नैसर्गिक पद्धतीने कसे उपचार केले जाऊ शकतात, हा विचार तज्ञांनी केला पाहिजे’, असे आवाहन केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment