डबेवाडी (जिल्हा सातारा) येथेे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन

सातारा – डबेवाडी (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ याविषयी प्रवचन पार पडले. सनातन संस्थेच्या सौ. रूपा महाडिक यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.

सौ. रूपा महाडिक यांनी साधना म्हणजे काय, आनंदी जीवनासाठी साधना कशी आवश्यक आहे, साधनेत दोषांवर मात करून गुण जोपासण्याचे महत्त्व, जीवनात सुख-दु:ख का येतात, काळानुसार कोणती साधना करावी, नामजप कसा करावा आदी शंकांचे निरसन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment