कलियुगात गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आनंदी राहण्यासमवेत जलद आध्यात्मिक प्रगती शक्य ! – राजाराम रेपाळ, सनातन संस्था

कै. हिंदकेसरी मारुति माने यांच्या जयंतीच्या निमित्ताने
‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन

कवठेसप्तर्षी येथे प्रवचनाला उपस्थित विद्यार्थी

सांगली – कलियुगात आध्यात्मिक उन्नत्तीसाठी कुलदेवतेचा आणि श्री दत्त यांच्या नामजपाची आवश्यकता आहे. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास जीव लवकरात लवकर शिवाशी जोडला जातो. त्यामुळे कलियुगात गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आनंदी राहण्यासमवेत जलद आध्यात्मिक प्रगतीही शक्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे साधक श्री. राजाराम रेपाळ यांनी केले. २७ डिसेंबर दिवशी हिंदकेसरी मारुति माने यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृती उद्यानस्थळी कवठेसप्तर्षी (कवठेपिरान) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि साधनेचे महत्त्व’ याविषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या प्रवचनाचे आयोजन ‘पैलवान भीमराव माने (आण्णा) युथ फॉऊंडेशन’ यांच्या वतीने करण्यात आले होते. याचा लाभ गाव आणि पंचक्रोशीतील अनुमाने ४०० हून अधिक नागरिकांनी घेतला, तर शाळेतील २०० विद्यार्थीही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment