
ऐरोली – सनातन संस्थेच्या वतीने येथील सप्तश्रृंगी मंदिरात ‘साधना आणि गुणवृद्धी’ शिबिर घेण्यात आले. सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी आणि साधनेत जलद प्रगती होण्यासाठी स्वभावदोष दूर करण्याची प्रक्रिया सोप्या भाषेत सांगितली. हिंदु जनजागृतीचे समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी कुलदेवतेचे नामस्मरण कसे करावे ?, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप का करावा ? या संबंधित उपस्थित शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. सौ. झाडे या जिज्ञासू शिबिराला थोडा वेळ थांबणार होत्या; परंतु त्यांना विषय इतका आवडला की, त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना शिबिरासाठी बोलावून घेतले.
२. देवळात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नामजपाचा विषय आवडला.
३. शिबिरात उपस्थित असलेल्या लहान मुलांनी पूर्ण मार्गदर्शन शांतपणे ऐकले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !